काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार यांचे कडून आर्थिक मदत

81

काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार यांचे कडून आर्थिक मदत

 

विवेकानंद नगरातील देवाजी सेलोटे (85) यांचे अल्पशा आजारपणामुळे दी 24/05/2023/ बुधवार सायंकाळी 4.00 निधन झाले . त्यांना दोन पत्नी एक मुलगी दोन मुल असा बराचसा आप्त परिवार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे संकट उभा ठाकला. वार्डातील प्रतिष्ठित काँगेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार यांनी सामाजिक भान जोपासून आर्थिक मदत केली. राकेश भाऊ नेहमीच गोर गोरगरीबांना आर्थिक मदत करीत असतात . या प्रसंगी वॉर्डातील काँगेस पार्टीचे युवा कार्यकर्ता मिलींद बारसागडे, वसंतजी सातपुते, संतोषभाऊ कोहचाले, प्रमोदजी जुमले, विनायकजी चीचघरे, बेबीताई कुमरे, वैशालीताई सातपुते, अनिताताई डोईजड, राजूभाऊ भारती, जीवनदासजी मेश्राम, रोहित भाऊ चंदावार, सुरज टेकाम, अमोल पगाले इत्यादी कार्यकरते उपस्थित होते.