*भंडारा जिल्हा महिला काँग्रेसची निवडणूक व संघटनात्मक आढावा बैठक*
*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना मोठी संधी मिळणार – भावना वानखेडे*
भंडारा जि. प्र.
भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मा.नफिशा अहमद शेख प्रभारी भंडारा जिल्हा महिला काँग्रेस व सहप्रभारी मा. भावना ताई वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीमध्ये भंडारा जिल्हा महिला काँग्रेसचा मागील ६ महिन्याचा आढावा भंडारा जिल्हा अध्यक्ष सौ.जयश्रीताई बोरकर यांनी सांगितला. वर्षभर आम्ही काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण कार्यक्रम घेत असतो, सामाजिक व राजकीय आंदोलनात आमच्या महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग भंडारा जिल्हा काँग्रेस मध्ये दिसून येतो. याचं बरोबर महिलांना कसे मजबूत करता येईल व त्यांच्या अडचणीवर कसे मात करता येईल यावर पण जयश्री ताई बोरकर यांनी सांगितले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी भंडारा जिल्ह्यात समोर येऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आमच्या काँग्रेसच्या महिला वर्ग जास्त संख्येने आम्ही जिंकून येऊ असे सांगितले. महिलांनी राजकारणात यावे असे त्यांनी आव्हाहन केले. राजकारणात महिलांचा आता ५०% वाटा असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे पण त्यांनी आपल्या भाषणा मध्ये सांगितले.
भंडारा जिल्ह्यात पुढे होऊ घातलेल्या नगर परिषद,नगर पंचायत, व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली जाईल अशी माहिती महिला काँग्रेसच्या प्रभारी नफिशा अहमद शेख यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले.
या बैठकीला प्रामुख्याने जि प सभापती स्वाती ताई वाघाये, जी प सदस्य मनीषा निंबांर्ते, जी प सदस्य शीतल राऊत, अनु जाती महिला अध्यक्ष मंजुषा चव्हाण,शहर अध्यक्ष पुष्पा साठवने, स्वाती हेडाऊ भंडारा तालुका अध्यक्ष, कुसुम कांबळे तुमसर तालुका अध्यक्ष, छाया ताई पटले साकोली तालुका अध्यक्ष, सारिका नागदेवे, सविता ब्राम्हणकर उपाध्यक्ष भंडारा जिल्हा, सरिता कुरंजेकर पं स सभापती साकोली,निर्मला कापगते, पुष्पा कापगते, अंजीरा चुटे, सुनीता कापगते, करुणा वालदे, नेहा रंगारी, कांचन काटेखाये, नम्रता बागडे, रीना नांदेश्वर, भावना नंदेश्वर, कुसुम कांबळे, करुणा धुर्वे, योगिता बावनकर, रेखा ब्राम्हणकर, लता कुळगावे, मंगला शेंडे, वैशाली बघमारे, वर्षा मेंढे, लोभा शिलार , सुन्नधा घणजोळे, निर्मला टेम्भूर्णे, वैशाली वालदे, प्रज्ञा नंदेश्वर व भारती कांबळे,अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.