विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकाचा लॉलीपॉप : खासदार बाळू धानोरकर

66

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकाचा लॉलीपॉप : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : आज मोदी सरकारने अर्थसंकल्पात केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू राज्यातील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून यांना अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा लॉलीपॉप दिला आहे. असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिकिया देताना म्हंटले आहे.
इतर राज्याच्या तुलनेत या चारही राज्यासाठी 2.27 लाख करोडच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहे. देशाला अन्नसुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भरीव काही तरतूद करण्यात आली नाही. कोरोनामुळे देशात हजारो रोजगार गेले, रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये खास काही नाही.
माध्यम वर्गीयांसाठी आयकरात सूट अपेक्षित होती ती फोल ठरली. त्यामध्ये काही दिलासा दिलेला नाही. एअर इंडीया, एल. आय. सी. ला विकण्याचा निर्णय ह्या मोदी सरकारने केला आहे. सरकारी जमीनी विकणार, बीपीसीएल पण सरकार विकणार असून हे सरकार सरकारी मालमत्ता विकणारे मोदी सरकार ठरणार आहे.
आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेती या घटकाला अर्थसंकल्पात केंद्र स्थानी ठेवण्यात आलेले नाही. महिला सबलीकरण याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या अर्थसंकपात सामान्य माणसावर अन्याय करण्यात आला आहे. अच्छे दिन च्या लॉलीपॉप देऊन हे मोदी सरकार दोनदा केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. आधीच पेट्रोल आणि इतर इंधनाचे दर मात्र १०० पार करत आहे. त्यात या बजेटमध्ये डिझेलवर ४ रु व पेट्रोलवर २.५० रु कृषीकर लावण्यात आला आहे. जीएसटी मधील कमतरता दूर करण्याचे केवळ आस्वासन दिल्या जात आहे. त्यामुळे देशातील व्यापारी वर्ग मोदी सरकारवर तीव्र नाराज आहे. मोबाईल चार्जर सारख्या ज्या चैनीच्या नव्हे तर प्रत्येकाच्या गरजेच्या वस्तू आहे. त्या सुद्धा महागवल्या आहे. या सर्व कारणामुळे आता मात्र या देशाच्या शेवटच्या माणूस व शेतकरी या मोदी सरकारला आपली जागा नक्की दाखवेल. अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे.