** महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सहाशे रुपये ब्रास रेती अहेरी तालुक्यात कधी मिळणार

48

** महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सहाशे रुपये ब्रास रेती अहेरी तालुक्यात कधी मिळणार

 

 

अहेरी. महाराष्ट्र शासनाने जी घोषणा केलेली आहे महसूल विभागाकडून 600 रुपयात एक ब्रास रेती हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जातो परंतु अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अजून पर्यंत या अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाही याकरता अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री डॉक्टर निसार हकीम यांच्या मागणीप्रमाणे पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे आणि मध्यमवर्गीय लोकांच्या बांधकामासाठी लागणारी रेती उपलब्ध झालेली नाही नवीन धोरणानुसार नवीन रेती घाटाचे लिलाव सुद्धा झालेले नाही शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 600 रुपयात एकब्रास रेती लवकरात लवकर महसूल विभागाने सुरू करून द्यावी अशी मागणी अहेरी काँग्रेस तालुकाध्यक्षांनी केली आहे