५%निधी साठी कराव्या लागणाऱ्या दिव्यांग नोंदणीला मुदतवाढ दया

61

५%निधी साठी कराव्या लागणाऱ्या दिव्यांग नोंदणीला मुदतवाढ दया
प्रहार संघटना आरमोरी वतीने नगरपरिषद ला निवेदन सादर

आरमोरी:- दरवर्षी नगरपरिषदच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग लोकांना एकूण जमा होणाऱ्या रकमेच्या ५%निधी हा स्थानिक दिव्यांग लोकांवर खर्च करण्याबाबत शासननिर्णय आहे त्याकरिता दरवर्षी नगरपरिषद मध्ये दिव्यांग नोंदणी करावी लागते,त्याप्रमाणे यावर्षी ही दिव्यांग नोंदणीचा कार्यक्रम नगरपरिषद मार्फत घोषित करण्यात आला परंतु त्याची माहिती आरमोरी नगरपरिषद मधील बहुतांश दिव्यांग रहिवासी लोकांना मुदत उलटूनही मिळाली नाही,त्यामुळे आपल्याला नोंदणी पासून वंचित राहावे लागून योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी कैफियत दिव्यांग बांधवांनी आरमोरी प्रहार संघटना यांच्यासमोर मांडली.
तेव्हा तात्काळ प्रहार संघटना आरमोरी चे कार्यकर्ते व काही दिव्यांग बांधव यांनी नगरपरिषद येथे जाऊन मा. नगराध्यक्ष साहेब यांच्याशी भेट घेऊन आपल्या नगरपरिषद द्वारे राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग नोंदणी कार्यक्रमची माहिती शेवटच्या तारखेपर्यंत बहुतांश दिव्यांग बांधवांना माहिती झालेला नाही तेव्हा अनेक दिव्यांग बांधव शासनाच्या या योजने पासून वंचित राहतील , तेव्हा एकही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनेपासून वंचीत राहता कामा नये याची परिपुर्ण पणे जाणिव मा. नगराध्यक्ष साहेब यांना करून देण्यात आली, तसेच नोंदणी साठी येणाऱ्या ऑनलाईन प्रमाणपत्र च्या अडचणी तसेच इतर बाबतही सकारात्मक चर्चा करून  दिव्यांग नोंदणीची तारीख वाढवून देऊन दिव्यांग बांधवांच्या माहितीसाठी नगरपरिषद द्वारे योग्यरीत्या पुकारा करून जनतेपर्यंत दिव्यांग योजनांची माहिती पोहचवावी
अश्याप्रकारचे निवेदन मा. नगराध्यक्ष साहेब आरमोरी यांना देण्यात आले.
त्यावेळी प्रहारचे निखीलभाऊ धार्मिक , केवळ दुमाणे , गुरुदेव वाटगुरे, प्रहार दिव्यांग संघटनेचे अनंतभाऊ भोयर , विनोद निमजे तसेच इतर प्रहार सेवक व दिव्यांग बांधव उपस्थित होते.