पगारदार कर्मचार्यांचे थकीत हफ्ते एलआयसी ने पाँलीसीधारकाच्या खात्यात जमा करा.
प्रहार शिक्षक संघटना भद्रावतीची मागणी
भद्रावती – पगारदार शिक्षकांचे नियमित वेतनातून दरमहा एलआयसी हफ्ते कपात होवूनही प्रशासकीय वा तांत्रिक बाबीमुडे रकमा अप्राप्त दाखवून मँच्युरिटीच्या वेडेस कपात केल्या जाण्याचा प्रकार मोठया प्रमाणात सुरु आहे. त्या करीता खातेदारांचे थकीत हप्ते वेळत जमा करण्यात यावे या करीता एलआयसी व्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले.
खातेदारांनी कार्यालयात चौकशी केली असता स्वत: संबंधित कार्यालयातून सेड्युल वा ईतर बाबी आणा असे सांगितले जाते. कर्मचार्यास सुट्टी काढून व पैसा खर्च करून संबंधित कामे स्वत: करावी लागतात. यात त्यांना नाहक मानसिक त्रास व आर्थिक भूदंड सहन करावा लागतो.
त्यामुडे जि. प. प्राथ. शिक्षकांच्या एलआयसी खात्यातील महीना व वर्ष निहाय तयार करुन संबंधित प्रशासकीय कार्यालयाला पाठवून व उचित कार्यवाही करून त्वरीत संबंधित निधी खातेधारकाच्या खाती जमा करण्यात यावा असे निवेदन प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने श्री पी.आर. सावर्लापूरकर ,व्यवस्थापक एलआयसी शाखा वरोरा यांना देण्यात आली यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे शंकर मिरे तालुकाध्यक्ष भद्रावती, पवन शर्मा तालुकाध्यक्ष वरोरा , श्रीकृष्ण गुजरकर,प्रभाकर मेंगरे, मोरेश्वर विद्ये, किशोर चंदनखेडे आदी उपस्थीत होते