खासदार अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती

72

खासदार अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती

गडचिरोली :- दि. 3/फेब्रुवारी

भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा.श्री समीर ओराव यांनी देशाचे गृहमंत्री तथा पुर्व अध्यक्ष मा श्री अमितजी शहा तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री जगत प्रकाश नड्डाजी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदांवर नियुक्ती केलेली आहे

खासदार अशोक नेते यांच्या नियुक्ती बद्दल चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमारजी भांगडिया, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आम.डॉ देवरावजी होळी, आरमोरी चे आमदार कृष्णाजी गजभे, माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज आत्राम, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर, माजी आमदार संजयजी पुराम, भाजपचे ज्येष्ठ नेते ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मा बाबूरावजी कोहळे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री ( संघटन) रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिप चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, जिप सदस्या लताताई पुंघाटे, अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश सदस्य संदीपजी कोरेत, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिप सदस्य नानाभाऊ नाकाडे, तसेच सर्व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.