नैताम कटुंबीयावरील पाच महिन्याच्या अंतराने बाप लेकीच्या आकस्मिक मृत्यूमूळे चंदनवेली सहीत एटापल्ली शोकमग्न

256

नैताम कटुंबीयावरील पाच महिन्याच्या अंतराने बाप लेकीच्या आकस्मिक मृत्यूमूळे चंदनवेली सहीत एटापल्ली शोकमग्न

एटापल्ली: येथील जिल्हा परिषद हायस्कुल एटापल्ली येथील आठव्या वर्गात शिकणारी कुमारी केतकी जयेंद्र नैताम वय 14 वर्षे या अल्पवयीन मुलीचा आकस्मिक मृत्यू व 11 ऑगस्टला वडिलांचा मृत्यू या पाच महिन्याच्या अंतराने बापलेकीचा मृत्यू मनाला चटका लावून गेला या एकाच कटुंबातील दोघांच्या मृत्यूमुळे कटुबियासोबत चंदनवेली व एटापल्ली येथे शोककळा पसरली.
मृतक मुलगी सकाळी तबेत बरोबर वाटत नसल्याने मोठ्या बहिणी सोबत ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे गेली.तेथील कर्तव्यावर असणारे डॉ. तोमटी यांनी उपचार करून दोन इंजेक्शन लिहून दिले.व ती इंजेक्शन घेण्यासाठी बाजूच्या रूममध्ये गेली असता कोणीतरी रुग्णालयातील दुसऱ्याच कर्मचाऱ्याने इंजेक्शन दिले.व ती इंजेक्शन दिल्याबरोबर बेहोश झाली.मग लगेच डॉ. बरडे याना बोलविण्यात आले.मग त्यांनी तपासून केतकी ही मृत झाल्याचे सांगितले.
ड्युटी वर असलेले डॉ किंवा नर्स इंजेक्शन न देता तिथल्याच दुसऱ्या कर्मचारी ने इंजेक्शन दिल्याने मृतक मुलिची मोठ्या बहिणींनी प्रत्यक्ष सांगितले. तिच्या आईला माहिती दिली असता तीला धक्काच बसला व ती रुग्णालयात गेली असता मुलीचे बोट व हात निळे पडल्याचे दिसत होते असे सांगितले. एकूणच त्यांच्या बोलण्यातून रुग्णालयाचा गलथान कारभार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
संबधीत कर्तव्यावर असणारे डॉ. तोमटी याना विचारणा केली असता ती व्यवस्थित बोलत होती तिला स्वाचोसवासाचा त्रास होता आदल्या दिवशी दिनांक 27/01/2021 रोजी सुद्धा रुग्णालयात मोठया बहिणीसोबत आली होती तिला एक्सरे काढायला सांगितले होते.त्या वेळेस डॉ बरडे होते त्या दिवशी काही प्रॉब्लेम असल्याने तिचे एक्सरे झाले नाही मग ती दुसऱ्या दिवशी 28 /01/2021 रोजी आली या वेळेस (डॉ तोमटी ) उपस्थित होते असे डॉ तोमटी यांनी संगितले तसेच तिचे एक्सरे काडून झाल्यावर तिची तपासणी करण्यात आली आणि दोन इंजेक्शन लिहून दिले. इंजेक्शन नर्स दिले की दुसरे कर्मचारी कोणी दिले हे मला माहित नाही .
एक शाळेत शिकणारी कमी वयाची मुलगी मृत झाल्याचे खुप वाईट झाले असे ते म्हणाले
एकंदरीत एक लहान आठव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी गेली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पोस्टमार्टेम रिपोर्ट यायची आहे खरे कारण ते आल्यावरच कळेल.