खाजगी अनुदानित शाळेत चित्रकला स्पर्धा

86

खाजगी अनुदानित शाळेत चित्रकला स्पर्धा.

 

देसाईगंज:-

मा.विवेक नाकाडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद गडचिरोली यांचे प्रेरणेतून व मा. रमेश उचे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक )जिल्हा – गडचिरोली. यांचे संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांकरिता त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा ,चित्रकलेतील त्यांची आवड निर्माण व्हावी,चित्रकला स्पर्धा हा तरुण मनांसाठी त्यांची कलात्मक कौशल्ये विकसित करण्याचा, त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्याचा आणि मौल्यवान अनुभव आणि ओळख मिळवण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. या स्पर्धा मुलांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी, इतरांकडून शिकण्यासाठी आणि त्यांची कलात्मक क्षमता एक्सप्लोर करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात या उद्देशाने शाळा स्तरावर जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील दि.7 ऑगस्ट 2023 ला चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .जिल्ह्यातील 36 शाळांनी 4500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळा मधील निवड झालेल्या मुलांना शाळास्तरावर बक्षीस देऊन गौरविण्यात करण्यात आले.

जिल्हास्तरीय स्पर्धा दि.9 सप्टेंबर 2023 ला अरमोरी येथे आयोजित करून निवड झालेल्या चीत्रांना जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रत्येक शाळेमधील प्रत्येक गटातून एक विद्यार्थी सहभाग घेतील.

स्पर्धा समन्वयक म्हणून श्री मो.आरिफ शेख मुख्याध्यापक रफी अहमद किदवाई प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल देसाईगंज हे जबाबदारी पार पडणार आहेत .

तसेच इय्यता 5 वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग दि.1 ऑगस्ट 2023 पासून नियमितपणे सुरू करण्यात आलेले असून मार्गदर्शन वर्ग नियमितपणे सुरू आहेत .खाजगी

प्राथमिक शाळेमध्ये इय्यता 5 वी च्या अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल व जिल्ह्यातील

शिष्यवृत्ती पात्रता धारक विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.तसा प्रयत्न आहे.शाळांमधील शिक्षकांना विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन मा.रमेश उचे यांनी केले आहे.