*दोन उपमुख्यमंत्री चालतात,मग दोन उपसरपंच करावे* *सोय जनतेची की,पुढाऱ्यांची*

81

*दोन उपमुख्यमंत्री चालतात,मग दोन उपसरपंच करावे*

 

*सोय जनतेची की,पुढाऱ्यांची*

 

*राज्यातील समीकरणांनी गावातही उलथापालथीचे संकेत*

 

*सर्वच गटांना हवी सत्ता:- विजय तोकला*

 

*सिरोंचा:-* गेल्या अनेक वर्षांपासून राज्यत सत्तेची समीकरण वेगळेच घडत आहे.यासाठी फोडाफोडी करून सत्ता काबीज करणे सुरू आहे.मुख्यमंत्र्यांच्या जोडीला दोन-दोन उपमुख्यमंत्री पद देण्याचाही प्रघात सुरू झाला आहे.सत्ता उपभोगण्यासाठी ही सोय असली तरी याचे पडसाद गावांमध्ये उठताना दिसून येत आहेत.राज्यात दोन उपमुख्यमंत्री बनवले जावू शकतात तर मग दोन उपसरपंचाची नेमणूक का?करण्यात येऊं नये,असा आवाज आता उठू लागला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटांनी खुर्ची काबीज केली.एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले. वर्षभरातच हा आजार राष्ट्रवादी काँग्रेसला जडला.युतीमध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गट मध्ये सामील झाले.सत्तेसाठी त्यानं उपमुख्यमंत्री बनविण्यात आले.आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्याचे पडसाद खेड्यापाड्यातील दिसून लागले आहे.ग्रामपंचायती मध्ये दोन उपसरपंच नेमण्याची मागणी पुढे लागली आहे.मुख्यमंत्र्यांच्या सोबतीला दोन उपमुख्यमंत्री ही सोय राज्याचा कारभार अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी आहे की,तीन पक्षातून असंतुष्टना शांत करण्याची तजवीज आहे.वेगळा विषय आहे.

ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायत मध्ये सरपंच एका गटाच्या व बहुसंख्य सदस्य दुसऱ्या गटाचे असतात.मनमानी करणाऱ्या सरपंचाला नामोहरम करण्यासाठी दोन उपसरपंचही नेमण्याची खेळी खेळली जात आहे.दोन उपसरपंचही नेमण्याची तरतूद करण्याची मागणी सरपंच संघटना यांनी केली आहे.