*येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये मार्कंडा देवस्थान मंदिराचे काम सुरू होणार*

42

*येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये मार्कंडा देवस्थान मंदिराचे काम सुरू होणार*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

 

*दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाचे चेअरमन, संचालक , सदस्य, यांची भेट घेऊन मार्कंडेश्वर मंदिराचे काम तातडीने सुरू करण्याची केली विनंती*

 

*मंदिराच्या बांधकामाच्या साहित्याची निविदा निघाली*

 

*दिनांक ११ऑगस्ट- दिल्ली*

 

*चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर देवस्थान मंदिराचे बांधकाम मधील काही वर्षांपासून प्रलंबित असून ते तातडीने सुरू व्हावे याकरिता आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी दिल्ली येथे जावून पुरातत्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी झालेल्या भेटीतील चर्चेत येत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिली.*

 

*यावेळी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे डीजी चेअरमन के. के. बासा, एडीजी जानविश शर्मा एडीजी डॉ आलोकजी त्रिपाठी , संचालक सुंदर पॉल आणि अधीक्षक अभियंता एस के कन्ना यांची भेट घेतली. व मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे याबाबत विनंती केली.*

 

*यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्कंडेश्वर देवस्थानच्या विकासासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची व काम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यादरम्यान झालेल्या चर्चेमध्ये मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामा संदर्भातील मटेरियल साहित्याची निविदा प्रक्रिया झालेली असून लेबर टेंडर प्रक्रिया देखील सुरू आहे . जवळपास २.२५ कोटी रुपयांच्या या निवीदा असून त्यानुसार मंदिराच्या देवस्थानाच्या विकासाचे काम येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये सुरू होईल असे या भेटीच्या प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांनी आमदार महोदयांना आश्वासन दिले.*