देवलमरी येथील तोकाला परिवाराला जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले आर्थिक मदत
अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील रहिवासी व्यंकटेश तोकला यांना डोक्याला जबर मार लागल्याने उपचाराकरिता अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर बाब जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच रुग्णालयात भेट घेवुन तब्येतीची विचारपूस केली असता डोक्याला जबर मार असल्याने चंद्रपुर रेफर केले. मात्र घरची परिस्थिती हलाकीचे असल्याने चंद्रपुर येथे येण्या – जाण्यास आर्थिक अडचण होत होती. याबाबत आर्थिक मदत मागितली असता जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, आविसचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, रमेश तोकला, राकेश सड़मेक, प्रकाश दुर्गे आदि उपस्थित होते.