प्रेमाचा असाही शेवट… प्रेमीयुगलांची गळफास घेवून आत्महत्या.

258

प्रेमाचा असाही शेवट…

प्रेमीयुगलांची गळफास घेवून आत्महत्या.
गडचिरोली-
धानोरा येथे प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली.
लिकेश भेंडारे वय 23 रा. पेंढरी जि. गडचिरोली आणि किरण नंदनवार वय 19 रा. भंडारा अशी मृतकांची नावे आहे.लिकेश हा धानोरा येथे रोजंदारीने काम करीत होता तर की किरण ही धानोरा येथे आपल्या नातेवाईकांकडे शिकत होती.धानोरा येथेच या दोघांचे प्रेमसंबंध जुळले.परंतु यांच्या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना नव्हती.

सोमवारी सकाळी किरण कॉलेजला जातो असे सांगून घराबाहेर पडली.ती संध्याकाळी घरी न आल्याने तिची शोधाशोध केली असता लिकेश च्या रूमवर दोघांचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले.
यावेळी किरणच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेले आढळले.या घटनेने धानोरा शहरात एकच खळबळ उडाली.