महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग बैठक आज दिनांक 29 रोजी पंडित बच्छराज व्यास विद्यालय नागपूर येथे विभाग अध्यक्ष अजय
वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच राज्य कार्याध्यक्ष मा नागो गाणार व राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पूजा चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. त्याचप्रमाणे विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी सदस्य नांदणी पावती पुस्तके हिशोब बाबत पदाधिकारी यांचे कडून आढावा घेतला,यात नागपूर विभागाची वार्षिक सदस्य 2000 झाले आहेत. उपाध्यक्ष माधुकर मूपिडवार, विभाग सहकार्यवाह घनश्याम पटले यांनी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्या सहावीच्यार सभेबाबत विचार व्यक्त केले. . यावेळी मा गाणार सर यांनी संघटना मजबूत करावी असे आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले , मा राजकुमार बोनकिले राज्य सरकार्यवाह यांनी राज्य अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत सुचविले. इतर उपस्थित पदाधिकारी यांनी सभेतील विशयावर आपली मत मांडली, यात नागपूर शहर कार्यवाह प्रमोद बोधे,चंद्रपूर ग्रामीण अध्यक्ष विलास खोंड, वर्धा जिल्हा कार्यवाह प्रदीप झलके , गोंदिया जिल्हा कार्यवाह भास्कर रहांगडाले, भंडारा जिल्हा कार्यवाह सुभाष गरपडे, नागपूर ग्रामीण अध्यक्ष गणेश चिखले, गडचिरोली जिल्हा कार्यवाह श्री सागर आडे , राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पूजा चौधरी यांनी पदाधिकारी यांची चांगल्या कामाची स्तुती केली व पुढे शिक्षक परिषदेचे कार्य असेच पुढे जाईल असे मत व्यक्त केले. सभेचे आभार कार्यालय मंत्री सुधार वारकर यांनी मानले. सभेला विभाग सहमहिला आघाडी प्रमुख ललिता हलमारे, वर्धा जिल्हा अध्यक्ष दीपक ढगे, गोंदिया जिल्हा कोषाध्यक्ष गजानन चांदिवले, नागपूर ग्रामीण महिला आघाडी प्रमुख एस. ए. नागरे, गडचिरोली जिल्हा संघटन मंत्री दिलीप तायडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष अनिल नुतीलकंठावार, जिल्हा कार्यवाह सागर आडे ,गडचिरोली जिल्हा कोषाध्यक्ष जिवन उईके, गडचिरोली जिल्हा संघटन मंत्री विश्वजित लोणारे, भंडारा जिल्हा कोषाध्यक्ष राधेश्याम धोटे उपस्थित होते. वंदे मातरम गाऊन व भोजनोत्तर सभा समाप्त झाली.