कोरोना भत्ता मिळेपर्यंत संघर्ष सुरु राहणार – कॉ. सुनंदा बावणे

38

कोरोना भत्ता मिळेपर्यंत संघर्ष सुरु राहणार – कॉ. सुनंदा बावणे.

 

भामरागड,

 

भयावह कोरोना काळात काम करवून घेण्याकरीता ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्करला कोरोना संपे पर्यंत प्रतिमहा एक हजार रुपये देण्यात येईल. असे शासना तर्फे घोषीत करण्यात आले होते. परंतु प्रत्येक्षात ते दिल्या गेले नाही. कोरोना भत्ता मिळावा या मागणीला घेउन मंगला मांझी यांचे अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात सुनंदा बावणे म्हणाल्या कोरोना भत्ता एक हजार रुपये तसेच अमृत आहार घरपोच पुरविणाऱ्यांना प्रति लाभार्थी पाच रुपये देण्यात येईल. असे घोषीत करण्यात आले होते. मात्र तो देखिल मिळाला नाही. प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले घोषीत केल्यानुसार अंगणवाडी महिलांना कोरोना भत्ता देण्यात यावा. अन्यथा या अन्यायाचे विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल. जयश्री वाळकं यांचे आभार प्रदर्शनाने मिटींग संपली मिटींगला प्रामुख्याने मनिषा पडालवार, श्रीनिवास गुन्नालवार, कविता मुलमुले, भावना डोंगरे आदी उपस्थित होत्या.