ओबीसी महामोर्चाच्या संदर्भात एटापल्लीच्या सभेत चर्चा व नियोजन महामोर्चामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय

111

ओबीसी महामोर्चाच्या संदर्भात एटापल्लीच्या सभेत चर्चा व नियोजन महामोर्चामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय

एटापल्ली: ओबीसी प्रवर्गातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी समाजातर्फे 22 फेब्रुवारी रोज सोमवाला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार एटापल्ली येथील समाजबांधवाच्या सहविचार सभेत घेण्यात आला.

महामोर्चाचे नियोजन करण्याकरिता शासकीय विश्राम गृह एटापल्ली येथे ओबीसी समाजबांधवाची सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.सभेमध्ये मोर्चातील प्रमुख मागण्या,समाज संगटन , मोर्चाची प्रसिद्धी,मोर्चाचे प्रवासाचे नियोजन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.ओबीसी प्रवर्गाचे प्रश्न,आरक्षण,व संपूर्ण तालुक्यातील ओबीसी बांधवामध्ये नियोजित मोर्चाबाबत जाणीव जागृती करून हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.सहविचार सभेला संतोष खापणे,महेश मोहूर्ले, मोहित सेलोटे,प्रा.घोंगडे,वासुदेव चनकापुरे,प्रा.वडसकर,प्रा.डांगे,प्रा.बारसागडे, प्रा.डोंगरवार,रविंद्र ठाकरे, भुते सर,भोयर सर,सचिन मोतकुरवार, प्रविण चन्नावार,परशुराम कोटारे,अश्विन जम्पलवार,ओमकार पूजलवार व तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.