आज गडचिरोली जिल्ह्यात1 नवीन कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त

70

आज 1 नवीन कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.12:-  आज जिल्हयात 1 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9274 वर पोहचली. तसेच सद्या 17 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.70 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.18 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.

नवीन 1 बाधितांमध्ये गडचिरोली 1 मधील जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 4 रूग्णांमध्ये गडचिरोली 2, भामरागड 2 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकूल नगर वार्ड क्र.23 बाय पास रोड गडचिरोली 1 जण आहे.
****