ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका

87

ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका,

या मागणीसाठी सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या तसेच जनतेच्या वतीने पालकमंत्री व उपविभागीय अधिकारी यांना हजारो आक्षेप अर्ज्याच्या गट्ट्या द्वारे दिले निवेदन.

14 फेब्रुवारीला बैठक घेऊन तीव्र आंदोलनाची दिशा ठरणार.

ब्रम्हपुरी :—चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करू नका,या मागणीसाठी 12 फेब्रुवारी रोजी सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या वतीने हजारो आक्षेप अर्जाचा सामूहिक गट्टा घेऊन मा.क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले त्या नंतर सर्वांनी मंत्री तथा पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालयावर धडक देत निवेदन देण्यात आले.यावेळी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी फोनद्वारे आंदोलन कर्त्याशी चर्चा करून ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठोस आश्र्वासन दिले.
चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करू नये यासाठी आता पर्यंत 4000 लोकांनी वैयक्तिक आक्षेप अर्ज नोंदविले तर 7000 लोकांनी सिनियर सिटीझन संघटनेच्या वतीने साह्यांचे निवेदन दिले आहेत तर हजारो लोकांनी वैयक्तिक ईमेलद्वारे आक्षेप नोंदविले आहे अनेक पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीने आक्षेप नोंदविले असल्याचे चर्चेत सांगण्यात आले आणि सध्या ग्राम पंचायत सरपंच निवडणूक सुरू असल्याने आक्षेप अर्ज नोंदविण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करत तातडीने ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून वगळण्यात यावे आणि भविष्यात जिल्हा निर्माण करतांना ब्रम्हपुरीलाच जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देऊन झाल्या नंतर लगेच माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक घेऊन पुढील रणनीती आखण्यात आली व एकाच वेळेस शिंदेवा ही, नागभिड आणि ब्रम्हपुरी तालुका कडकडीत बंद करून तीव्र आंदोलन छेडण्या साठी महत्वाची बैठक येत्या 14 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता सुधीर भाऊ सेलोकर यांच्या अतिथी रेस्टाऊं ट मध्ये आयोजित केली आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात आले.निवेदन देताना माजी आमदार अतुल भाऊ देशकर,प्रा.बजाज सर, चोले सर,सुधीर सेलोकर , काँग्रेस नेते प्रभाकर सेलोकर , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे,वंचित बहुजन आघाडीचे ड्रा. प्रेमला ल मेश्राम,शिवसेना चे नरू नरड,बी आर एस पी चे संजय मगर सर,सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रा.देवेश कांबळे, सुखदेव प्रधान सर ,प्रा.प्रकाश बगमारे ,पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर, सदक्ष सुनीता ठवकर,पत्रकार संघाचे विजय रामटेके,अमर गाडगे,दिवाकर मंडपे ,प्रमोद आस टकर,नगरसेवक मनोज वटे,रिपाईचे रामटेके यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
दि.12/2/2021
आपली
ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समिती ब्रम्हपुरी