न.प. भद्रावती व अजय बहूउद्देशिय संस्था भद्रावती जि.चंद्रपूर.यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान
संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण-2021 तसेच महाराष्ट्र भर “माझी वसुंधरा अभियान” राबविण्यात येत आहे त्यात भद्रावती शहर सुद्धा सहभागी झालेले आहे , त्या अंतर्गत शासनाने पृथ्वी,वायू,जल,अग्नी व आकाश निसर्गाच्या या पंचतत्वासंबंधी आखून दिलेल्या सूचनांना अनुसरुन दिनांक १३.०२.२०२१ रोज शनिवार ला विजासन येथील बुद्ध्लेणी परिसरात न.प. भद्रावती व अजय बहूउद्देशिय संस्था भद्रावती जि.चंद्रपूर. यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये श्रमदानाचे माध्यमातून विजासन येथील बुद्ध्लेणी परिसर स्वच्छ करण्यात आला व माझी वसुधरा अंतर्गत हरित शपथ देण्यात आली सदर अभियानात न.प. स्वच्छता कर्मचारी व अजय बहूउद्देशिय संस्थेतील अध्यक्ष सौ.स्वाती रा.धोटकर व इतर सदस्य उपस्थित होते.