कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नांत बस घसरली रस्त्याच्या कडेला

88

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नांत बस घसरली रस्त्याच्या कडेला

१२ प्रवासी सुखरूप बचावले

देसाईगंज:-  कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात गेली. मात्र, सुदैवाने बस न उलटल्याने बसमधील १२ प्रवासी व चालक – वाहक सुखरूप बचावले.
ही घटना कोंढाळा-देसाईगंज मार्गावर शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली.

मागील पावसाळ्यात रस्त्याच्या लगतची माती वाहून गेली. त्यामुळे रस्त्यालगतच खड्डे पडले आहेत. डांबरी रस्ता व बाजुची माती यांच्यामध्ये जवळपास एक फुटाचे अंतर पडले. त्यामुळे एखादे वाहन डांबरी रस्त्याच्या खाली उतरल्यास ते उलटण्याची शक्यता राहते.
एमएच ०६ एस ८८३२ क्रमांकाची बस गडचिरोलीवरून देसाईगंज कडे जात होती. दरम्यान अपघात घडला.
उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी घटनास्थळाला भेट दिली. रस्त्यावरील कडा भरण्याची मागणी होत आहे.

देसाईगंज तालुक्यातील अनेक रस्त्यांचे नव्यानेच डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यांच्या बाजुला असलेल्या कडा भरल्या जात नाही. डांबरीकरणासोबतच कडाही भरून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपविण्याची गरज आहे.