मोहझरी ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवड..

69

मोहझरी ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवड..
आरमोरी प्रतिनिधी:-
मोहझरी दि .12 फरवरी 2021 :- ग्रामपंचायत भवनात सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सरपंच पदाकरिता मयूर कोडाप तर उपसरपंच पदाकरिता संतोष निकुरे यांनी फॉर्म भरले .त्यांच्या विरोधात कोणत्याही नवनिर्वाचित सदस्यांनी फॉर्म न भरता बिनविरोध सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. सुमारे चार वाजताच्या दरम्यान गावातील नवं युवकांनी बँड वाजाच्या गजरात मिरवणूक काढली .यात नवनिर्वाचित सरपंच मयुर कोडाप व उपसरपंच संतोष निकुरे यांचे स्वागत केले ..
याबरोबरच माजी सरपंच शालिकराम जी मोहुर्ले यांचेही शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. नवयुवकात आणि गावकऱ्यांत आनंदाचा वातावरण दिसून येत होता .यात नवनिर्वाचित सदस्यांनी व गावकऱ्यांनी दाखवलेले एकतेच्या प्रदर्शनाचा परिसरातून कौतुक होत आहे..