पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांचे विचार प्रेरणा देणारे- डॉ मंगेश गुलवाडे

156

पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांचे विचार प्रेरणा देणारे- डॉ मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर च्या वतीने पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्

चंद्रपूर : – चंद्रपुर शहरातील स्थानिक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपुर येथे पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे मनोगत व्यक्त करत होते त्यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले की पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांचे विचार कार्य करण्यासाठी व संघटन मजबूत करण्यासाठी प्रेरणा देणारे असून त्यांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मसात करून पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करावे असे यावेळी बोलताना सांगितले.
सदर कार्यक्रमात भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद कडू यांनी पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव करून कार्यकर्त्यांना मागदर्शन केले यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,महिला आघाडी अध्यक्षा अंजलीताई घोटेकर, स्थायी समिती सभापती रवी आसवांनी,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे, रवी लोणकर,संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार,भाजप उपाध्यक्ष रामपाल सिंग, तुषार सोम,राजीव गोलीवार,धनराज कोवे,धम्मप्रकाश भस्मे,रामकुमार अक्कपेल्लीवार यांची उपस्थिती होती.