मेंडकी ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व विरोधी गटाचा सुपडा साफ
ब्रह्मपुरी :- तालुक्यातील सर्वात मोठी विकसीत ग्रामपंचायत असलेल्या मेंडकी ग्रामपंचायतीवर दि. ८ फरवरी २०२१ ला झालेल्या सरपंच/उपसरपंच पदाच्या निवडीत भाजपचा धुव्वा उडवित काँग्रेसने बाजी मारली काँग्रेसकडे सात सदस्य होते तर भाजपाकडे चार सदस्य होते, मेंडकी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सरपंचपदाच्या निवडीत काँग्रेसच्या सौ मंगलाताई सुधाकर ईरपाते ह्या अविरोध, तर उपसरपंचाचे निवडीत काँग्रेसची एक सदस्या भाजपच्या बाजूने गेल्याने उपसरपंच उत्तम ऋषीजी सोनुले यांची सहा विरुद्ध पाच मताने निवड करण्यात आली.
मोठ्या प्रमाणात मेंडकी ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच पदाच्या निवडीत डावपेच विरोधकांकडून आखण्यात आले होते परंतु ते डावपेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडले आणि विरोधी भाजप गटाचा सुपडा साफ करीत अखेर काँग्रेसच्या सौ मंगला सुधाकर इरपाते सरपंचपदी तर उत्तम ऋषीजी सोनुले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
या निवडणुकीत गट प्रमुख तथा ब्रम्हपुरी पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांची खूप मेहनत आहे, तसेच त्यांचे सहकारी ब्रह्मपुरी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगलाताई लोनबले, चंद्रपूर जिल्हा परिषद माजी सदस्य भावनाताई ईरपाते, ऋषीजी, सोनुले, नरेश वाघुळकर, गणेश गुरनुले, मनोज अगडे, सुनील आंबोरकर, पटवारी वाटगुरे, अक्षय चंदनखेडे, घनश्याम जेल्लेवार, गोविंदा ठाकरे, वसंता मारबते, हरिचंद्र वैरकार, किशोर सहारे, हिरामण कसारे, प्रशांत चौधरी, मधुकर करंजेकर, मनोहर कायरकर आनंदराव जेंगठे, नामदेव वसाके, नीलकंठ लांजेवार, सचिन गभणे अरुण करजेंकर, मधुकर कोरेवार आदी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते व युवक काँग्रेस महिला काँग्रेस चे सर्व आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या सर्वांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे अभिनंदन केले व पुढील विकासाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.