*सेवा सुशासन व गरीब कल्याणकारी योजनांची माहिती भाजप महिला आघाडीनी जनतेपर्यंत पोहचवावी:- सौ.योगीताताई पिपरे*

40

*सेवा सुशासन व गरीब कल्याणकारी योजनांची माहिती भाजप महिला आघाडीनी जनतेपर्यंत पोहचवावी:- सौ.योगीताताई पिपरे*

 

*भाजपा महिला आघाडी गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वय आरमोरी विधानसभा क्षेत्र तालुका कोरची येथे बैठक संपन्न.*

 

*राष्ट्रवादी महिला पदाधिकारी यांचे भाजप मध्ये पक्ष प्रवेश*

 

*गडचिरोली:-दि.१ जानेवारी*

 

*मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सेवा सुशासन व गरीब कल्याणकारी योजनांची माहिती भाजप महिला आघाडीने जनतेपर्यंत पोहोचावी तसेच प्रत्येक बुथ सक्षम करावे,असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका सौ योगिताताई पिपरे यांनी केले.*

 

*भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली-चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची बैठक भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका सौ.योगीताताई पिपरे,जिल्हाध्यक्ष सौ. गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात व भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी,महिला आघाडी जिल्हा महामंत्री प्रितिताई शंभरकर,गडचिरोली शहर अध्यक्ष सौ.कविताताई उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची तालुक्यात मा. श्री. नसरूजी भामानी यांचे निवासस्थानी बैठक संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.*

*आगामी लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकिसाठी महाविजय 2024 ही मोहीम हाती घेऊन भाजपा महिला आघाडीच्या वतीने मा. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या ९ वर्षाच्या सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात यावी.तसेच महिला आघाडीने प्रत्येक बुथ सक्षम करावे.यावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.*

*याप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडी कोरची तालुका अध्यक्ष गिरजाताई कोरेटी यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला.भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका सौ.योगीताताई पिपरे यांनी भाजपचा दुपट्टा देवुन त्यांचे स्वागत केले.*

*बैठकीला महिला आघाडी कोरची तालुका अध्यक्ष सौ. शिलाताई सोनकत्री,कोरची नप माजी नगराध्यक्ष सौ.ज्योतिताई नैताम,मालताताई हिडामी,शांताताई मडावी,दुर्गाताई मडावी,प्रतिभाताई मडावी,कौशल्याताई काटेंगे, आणिताताई नरोटी,निलकमल मोहूर्ले,मंजुषा कुमरे,सगुणा काटेंगे,जयाताई सहारे,जयाताई बागडे तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*