*हिट अँड रन कायदा रद्द करा ; वाहन चालक संघटनांची मागणी*

90

*हिट अँड रन कायदा रद्द करा ; वाहन चालक संघटनांची मागणी*

 

*”हिट अँड रन कायदा” वाहन चालकावर अन्याय करणारा*- डॉ. नामदेव किरसान

 

गडचिरोली :: केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन ” कायदा पारित केला आहे, या कायद्यामुळे अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट

10 वर्षे कारावास आणि 7 लक्ष रुपयाचे दंड अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे. अपघात घडल्यास जखमीना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे, त्यामुळे कोणताही वाहन चालक अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून चालकावर प्राणघातक हल्ले केल्या जातात व जिवे मारण्याचा प्रयत्नही होतो त्यामुळे आत्मसंरक्षनासाठी वाहन चालक घटनास्थळावरून निघून जातात त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षा करणे हेही अमानवीय आहे, त्यामुळे  ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून हा कायदा चालकावर अन्याय करणारा आहे असे प्रतिपादन डॉ. नामदेव किरसान यांनी या मोर्चादरम्यान केले.

कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस परिवहन विभाग, जय संघर्ष ग्रुप, छत्रपती शिवराय ऑटोरीक्षा संघटना आणि विविध वाहन चालक संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याल्यावर धडक मोर्चा नेण्यात आला,  व जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फतीने केंद्रीय गृहमंत्र्याकडे “हिट अँड रन कायदा” त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली – चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस परिवह सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान काँग्रेस अध्यक्ष वामनराव सावसाकडे, युवा काँग्रेस नेते अतुल मलेलवारं, अरविंद निमगडे, विजय कृपाकर, विनोद बनकर, दिनेश कोहचाळे, जमीर शेख, संजय नेरकर,जावेद खान, अमोल बोरकर, गणेश नैताम, जितेंद्र फुलझेले सह मोठ्या संख्येने वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.