*एटापल्ली शहरात आयुष्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न*

56

*एटापल्ली शहरात आयुष्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न*

 

◆नगरसेवक राहुल कुळमेथे यांचा हस्ते उदघाटन

 

एटापल्ली- दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी प्रभाग क्रमांक १२ एटापल्ली येथे आयुष्य मंदिराचे(आपला दवाखाण्याचे) लोकार्पण सोहळा पार पडला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाण्याचे रूपांतर “आयुष्य मंदिर” म्हणून केले आहे. तसेच सरकारी रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी दिसून येते.अगदी ताप, सर्दी अश्या आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैदकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर रुग्णालय गाठावे लागते. याकरिता राज्यभरात प्रत्येक तालुका स्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संकल्पनेतून आपला दवाखाना उघडण्यात येत आहे.त्यांच प्रमाणे एटापल्ली तालुका स्थळावर सुद्धा उघडण्यात आले. सदर आयुष्यमंदिरात मोफत वैदकीय तपासणी, औषध उपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण सेवा उपलब्ध असतील.या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी नगरपंचायतीचे नगरसेवक राहुल कुळमेथे, बिरजू तिम्मा नगरसेवक, प्रविण चौधरी मुख्याधिकारी नगरपंचायत एटापल्ली, डॉ.सचिन कन्नके तालुका वैदकीय अधिकारी, किसन मट्टामी तालुका प्रमुख शिवसेना,शिवाजी रसाळ प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत एटापल्ली तसेच विविध प्रभागातील नागरिक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.