देसाईगंज तालुक्यात बूथ कमेंट्या स्थापित करून पक्ष संघटन मजबूत करा – जिल्हा अध्यक्ष रवी वासेकर

31

देसाईगंज तालुक्यात बूथ कमेंट्या स्थापित करून पक्ष संघटन मजबूत करा – जिल्हा अध्यक्ष रवी वासेकर

……………………………….देसाईगंज……. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या रूपाने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व प्राप्त झाले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री यांच्या सारखे कर्तृत्वान, जिल्ह्याच्या विकाशा साठी सदैव तत्पर असणारे, जिल्ह्यामध्ये विविध उद्योग आणणारे असे नेतृव आपल्या जिल्ह्याला प्राप्त झाले अश्या नेत्यांचा फायदा घेऊन कार्यकऱ्यांनी तालुक्यात पक्ष मजबूत करण्या करता गावा गावात बूथ कमेंट्या तयार करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर यांनी केले आहे.

स्थानिक विश्राम गृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देसाईगंज तालुका व शहर कार्यकरणीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी. जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर होते. प्रमुख उपस्थिती प्रदेश संघटन सचिव युनूसभाई शेख,जिल्हा परिषदेचे माजी सभापती केशरी पाटील उसेंडी, अल्पसंख्यांक चे जिल्हा अध्यक्ष आरिफ भाई पटेल,तालुका अध्यक्ष संजय साळवे, शहर अध्यक्ष लतीफ भाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, जिल्हा संघटन सचिव मनोज तलमले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोटवार, सेवादलचे जिल्हा अध्यक्ष. पायधन, जिल्हा संघटन सचिव प्रल्हाद वाघारे, जिल्हा डाकराम वाघमारे, जिल्हा संघटक सचिव हंसराज लांडगे अंबादास कांबळी, युवक चे विधानसभा अध्यक्ष समीर पठाण, तालुका अध्यक्ष चिराग भागडकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, विलासभाऊ ठाकरे, सुरेंद्र नाकाडे, नामदेव मेश्राम रामचंद्र ठाकरे यादवजी भुरले, लीलाधर भर्रे, ममिता आळे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते