जि.प.हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे विज्ञान प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा

45

जि.प.हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे विज्ञान प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा

एटापल्ली ता.प्र.

जि. प.हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये दुसऱ्या दिवशी 3 जानेवारीला समारोपीय कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यात तालुक्यातील एकूण 48 प्रतिकृती विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी झाले. प्रश्नमंजुषा, आनंद मेळावा , बालिका दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.आनंद मेळाव्यामध्ये विध्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून कार्यक्रमात रंगत आणली.

विध्यार्थी, व कार्यक्रमात सहभागीझालेल्या विविध मान्यवरांनी व शिक्षक वृंदानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन कौतुक केले.

या दोन दिवशीय समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटक निखील कुमरे गटशिक्षणाधिकारी प.स.एटापल्ली तर अध्यक्षस्थानी प्राचार्य विनय चव्हाण जि. प.हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य नारायण बोरकुटे,पौर्णिमा शिंपी मुख्याध्यापिका,अशोक कोवे गटसमनव्यक,जिजाबाई झाडे साधनव्यक्ती,सूरज उतरवार, कविता कोलप्याकवार,प्रा.राहुल ढबाळे,प्रा.गणेश आत्राम,प्रा.सोनकांबळे,डॉ.सचिन कांबळे तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन ज्योती कोस्केवाड यांनी तर प्रास्ताविक कन्हैया भांडारकर यांनी तर आभार किशोर खोब्रागडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतसाठी गजभिये साधनव्यक्ती, पुंघाटी साधनव्यक्ती,व जि. प.हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकवृंदानी सहभाग घेतला.

विज्ञान प्रदर्शनीमध्ये उच्च प्राथमिक विभागातून प्रथम क्रमांक श्रेया अलोने,प्रणाली झाडे जि. प.प्रा.शाळा डुंमे,द्वितीय क्रमांक इंद्रजित मडावी जि. प.उच्च प्रा.शाळा गुरुपल्ली तर तुतीय क्रमांक रिया झाडे जि. प.उच्च प्रा.शाळा बुर्गी उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक राजश्री बोरकर जि. प.हायस्कूल एटापल्ली द्वितीय क्रमांक वेदास सुरमवार जि. प.हायस्कुल एटापल्ली तृतीय क्रमांक निशा नरोटी शासकीय आश्रम शाळा एटापल्ली प्राथमिक शिक्षक गटातून टी.आर.नंदगीरवार प्रा.शि.जि. प.प्रा.शाळा मंगेर माध्यमिक गटातून वैभव चिमरालवार मा.शिक्षक भगवंतराव आश्रम शाळा बुर्गी प्रयोगशाळा परिचर गटातून शांताबाई सोमनकर रा.रा.रा.हायस्कुल एटापल्ली आदिवासी गट उच्च प्राथमिक गटातून गीता पोटावी जि. प.उच्च प्रा.शाळा परसलगोंदी आदिवासी गट माध्यमिक गटातून अर्चना तुमरेट्टी भंगवनतराव माध्यमिक विद्यालय तर पश्नमंजुषा गटातून कल्पना चावला गटांनी नंबर पटकाविला. अशा प्रकारे दोन दिवशीय कार्यक्रम उत्साहात पार पडले.