वाघाचे परिसरातच वास्तव्य शिवनी पाठ दरम्यान आढळले पग मार्क
अहेरी : अहेरी येथून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतलपेट येथील सुषमा देविदास मंडळ हिला सात जानेवारी 2024 ला वाघाने ठार केले.
त्यानंतर हा हिंसक वाघ चिंतल पेठ परिसरातच फिरत असून काल या वाघाचे पग मार्क नजीकच्या शिवनी पाठ गावात आढळले आहे.
यातच स्थानिक परिसरात वाघाच्या अफवांना ऊत आला असून या गावात आढळतात त्या गावात आढळला अशा चर्चा परिसरातील ग्रामीण भागांमध्ये सुरू आहेत. एकंदरीत स्थानिक परिसरात वाघाची प्रचंड दहशत असताना वन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र स्थानिक परिसरात दिसत आहे.
तर दुसरीकडे आम्ही भरपूर उपायोजना करत आहोत असा कांगावा वन विभागाचे अधिकारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना करीत आहेत. गेल्या दोन दिवसापासून चिंतलपेठ येथील नागरिकांना घराबाहेर निघण्याची भीती वाटत असतानाही शंभर रुपयाचा एक साधा बॅनर सुद्धा या गावात लावला नसल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
चिंतल पेठ इथे दिनांक सात जानेवारी 2024 ला वाघ आणि सुषमा मंडळ हिचा बळी घेतल्यानंतर त्या दिवशी दिवसभर वाघ याच परिसरात सक्रिय होता. च्या बाजूलाच दोन किलोमीटर असलेल्या जामगाव रस्त्यावर गुरांच्या मागे वाघ लागला असल्याचे अनेकांनी बघितले. वाघाच्या भीतीने चिंतलपेठ व जामगाव येथील नागरिकांनी मुलांना जंगलातच सोडले आणि ते गावाकडे परत आले. यानंतर दुसऱ्या दिवशी महागाव, सुभाष नगर,मुत्तपुर, वडला पेठ आदि गावांच्या परिसरात वाघ फिरत असल्याची चर्चा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होती. चर्चेच्या या भीतीतून शेती काम असतं जाणारे बहुतेक नागरिक घरीच होते. केवळ दुचाकी आणि चार चाकी धारक आपली वाढ घेऊन गावाच्या बाहेर पडत होते. यादरम्यान चिंतलपेठ इथून जवळच असलेल्या शिवनी पाठ या गावाच्या आजूबाजूला वाघाचे पगमार्क म्हणजेच पावलांचे निशान आणि अनेक गावकऱ्यांना दिसले. यावरून तूर्तास या वाघाचा मुक्काम चिंतल पेठ शिवणी पाठ व जवळपासच्या गावादरम्यान असल्याचे लक्षात येत आहे.
सदर हिंसक वाघाने चिंतल पेठ परिसरात तळ ठोकला असल्याने संपूर्ण परिसर भीती ग्रस्त आहे. वन विभाग फारसा गंभीर नसल्याचे सुद्धा दिसून येते. स्वतःची सुरक्षितता राखून वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी चार चाकी वाहनांमध्ये येऊन आलिशान दौरे करीत आहेत. गावाच्या आजूबाजूला कुठेतरी आम्ही दौरे करतो हे भासवत आहेत. वाहनाच्या खाली उतरून जंगलात फिरण्याची हिंमत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नसल्याचे स्पष्ट दिसून येते. एकंदरीत वनविभाग स्वतःलाच असुरक्षित समजत आहे.
जनजागृती शून्य
चिंतलपेठ व परिसर वन विभाग आलापल्ली अंतर्गत मोडतो. ठार केल्याची मोठी घटना घडली आणि दोन दिवसापासून परिसरातच वाघाचे वास्तव्य आहे. याची पूर्ण कल्पना उच्चपदस्थ वनाधिकाऱ्यांना असताना सुद्धा एकही वनाधिकारी या गावांकडे भटकला नाही. चिंतलपेठ, आपापल्ली, वडलापेठ, या गावांमध्ये शंभर, दोनशे रुपये किमतीचे बॅनर लावलेले नाही. धनिक्षेपकाच्या माध्यमातून गावागावांमध्ये मुनादी किंवा दिवंडी देण्याचे काम वन विभागाकडून अपेक्षित होते. वनविभागाकडे वाहनांचा मोठा फौज फाटा असताना ही बाब सुद्धा वनविभागाकडून टाळल्या जात असल्याचे दिसून येत आहे. परिसरात वाघाचे पग मार्क मिळतात याचा अर्थ वाघ परिसरातच आहे असा होत आहे. ही बाब सामान्य माणूस सुद्धा समजू शकतो. स्वतःचा जीव वाचवण्याचे नियोजन तो आपल्या पातळीवर करत आहे. पण शासनाचा मोठा मासिक मोबदला घेऊन सुद्धा वन विभागाचे अधिकारी मात्र लोकांना वाऱ्यावर सोडत आहे.