*योजनांचा थेट लाभ देऊन महिलांचा विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध – खा.अशोक नेते.*
—————————————-
*गडचिरोलीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा उत्साहात शुभारंभ*
गडचिरोली : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडचिरोलीत भरगच्च कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे, लाईट्स अँड मेटल चे मालक प्रभाकरणजी, जिल्हाधिकारी संजय मिना सर,पुलीस अधीक्षक निलोत्पल साहेब, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, महिलांना समाजामध्ये दुय्यम स्थान दिले जाते. पण या महिलांना योग्य सन्मान मिळण्यासोबत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ महिलांना देत आहे. यात एक कोटी महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ, २० लाख नवीन महिलांना शक्ती गटाशी जोडणार, १० लाख महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणार, १० लाख उद्योजिकांना ग्राहक पेठ उपलब्ध करून देणार, ५ लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देणार, अशा विविध योजनांचा लाभ थेट महिलांना व्हावा यासाठी शासन आपल्या स्तरावर काम करीत असल्याचे खा.नेते याप्रसंगी म्हणाले.
यावेळी १४९ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या ३० विकासकामांचे भूमीपूजन, तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नवरत्न महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या अभियानांतर्गत महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विविध सरकारी योजनांचे स्टॉल, बचत गटांची नोंदणी, शक्ती गटांची महिला बचत गटांची जोडणी, महिलांना वैयक्तिक उद्योग व व्यावसायिक प्रशिक्षण, घरगुती तयार केलेल्या उत्पादन वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करणे, अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सशक्तिकरण केले जाणार असून त्याचा सर्व महिलावर्गाने लाभ घ्यावा, असे आवाहनही खा. अशोक नेते यांनी कमिना