वेकोली (कोल माइन्स) मध्ये स्थानिकांना रोजगार द्या….

88

वेकोली (कोल माइन्स) मध्ये स्थानिकांना रोजगार द्या….

चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांचा यंग चांदा ब्रिगेड चा एलगार

चंद्रपूर – वेकोलीत स्थानिक युवकांना रोजगार द्या या मागणीकरीता सोमवारी १५ फेब्रुवारीला आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यासह हजारो बेरोजगार युवक, महिला सहभागी होत्या.

चंद्रपूरात सर्वत्र वेकोलीची जाळे पसरले आहे. याचा मोठा दुष्यपरिणामही प्रदुषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले तरी या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिल्या जात नाही. परिणामी उद्योग असूनही येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामूळे वेकोली अंतर्गत चालणा-या विविध कंपण्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या प्रमूख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाला शहरातील गांधी चौकाजवळून सुरुवात झाली शहराच्या मुख्य मार्गाने होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात जिल्ह्याभरातून हजारोच्या संख्येत नागरिक सहभागी होते.