पोस्टे आरमोरी येथील दारुच्या विविध गुन्ह्रातील एकुण 75,93,720/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

40

 

पोस्टे आरमोरी येथील दारुच्या विविध गुन्ह्रातील एकुण 75,93,720/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

 

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे आरमोरी हद्यीतील अवैध दारु विक्री करणा­यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे आरमोरी येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये सन 2018 ते ऑगस्ट 2023 पर्यत प्रलंबित असलेला 247 गुन्ह्यातील देशी/विदेशी दारुचा एकुण मुद्येमाल मा. प्रथम श्रेणी न्यायालय आरमोरी यांचे आदेशाने व मा. अधीक्षक, राज्य उत्पादक शुक्ल गडचिरोली यांचे मार्फतीने त्यांचे समक्ष योग्य ती काळजी घेवुन नगर परिषद आरमोरी यांनी नेमुन दिलेल्या जागेवर काल दिनांक 24/01/2024 रोजी सुरक्षीत रित्या एकुण 75,93,720/- रुपय किंमतीचा देशी/विदेशी दारुचा मुद्देमाल जे. सि. बी. च्या सहाय्याने 12 न् 12 लांबी, रुंदी खोल खड्डा खोदुन रोडरोलर च्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवुन काचेच्या व प्लास्टीकच्या बॉटल चुरा करण्यात आला व काचेचा चुरा योग्य काळजी घेवुन खड्यात टाकुन खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

तसेच पोस्टे आरमोरी येथे 2005 ते 2021 पर्यंतच्या विविध गुन्हयासंबंधीत जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनाचे लिलाव करण्यासाठी मा. उपविभागीय दंंडाधिकारी सा. वडसा यांचे आदेशाने व श्री. वाय आर. मोडक सा. मोटार वाहन निरिक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय. गडचिरोली यांचे कडुन वाहनाची किंमत निश्चित करुन श्री. एच. एन. दोनाटकर, नायब तहसिलदार सा. आरमोरी यांचे अध्यक्षतेखाली स्थापीत समितीने लिलाव प्रक्रियेस सुरुवात केली या लिलावामध्ये बोली लावण्याकरीता नागपुर, यवतमाळ, गडचिरोली, आरमोरी येथील 37 लायन्सस धारक भंगार खरेदी करणारे ट्रेडर्स सहभागी झाले होते. निकाली लागलेल्या गुन्ह्यातील एकुण 40 नग मोटार सायकल 1,58,000/- रु. किंमत व चारचाकी 06 वाहणे 2,33,100/- रु. अशी एकुण 3,91,100/- रुपयाचे लिलावात वाहनांची विक्री करण्यात आली. सदर वाहन वाहतुकीकरीता रोडवर वापरण्यात येणार नाही याबाबत योग्य समज देण्यात आली व सर्व वाहने क्रॅश करुन घेण्यास परवानगी देण्यात आली. सदर लिलावातुन प्राप्त झालेली एकुण रक्कम 3,91,100/- रुपये शासन खात्यात जमा करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. मयुर भुजबळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलिक यांचे नेतृत्वात व हेड मोहर्र पोहवा/1035 रघुनाथ तलांडे व सर्व पोस्टेतील अंमलदार यांच्या उपस्थीतीत पार पडली.