*गांधीनगर येथे तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने कार्यकर्त्याची बैठक संपन्न*
*गांधीनगर*
आज दिनांक 26/01/2024 रोजी मौजा गांधीनगर येथील जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते तथा युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची गाव कमिटी संदर्भात तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीविषयी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मार्गदर्शक म्हणून तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्रजी बुल्ले, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय करांकर, निरिक्षक टिकाराम साहारे उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना भेटी घेऊन सामूहिक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत कार्यकर्त्याना मार्गदर्शक करतांना राजेंद्र बुल्ले म्हणाले की, 2014 पूर्वी काँग्रेस च्या काळात जी परिस्थिती होती ती भाजप सरकारच्या काळात पुर्णपणे बदलली आहे, महागाई, खाजगीकरण च्या नावावर मतदारांना एकमेकांच्या प्रती भडकविणे, रोजगार, विविध परीक्षेच्या वेळी होत असलेली पेपर फुटी आदी संदर्भात बुल्ले यांनी उपस्थित कार्यकर्त्याना सविस्तर मार्गदर्शन केले. व काँग्रेस सत्तेत असताना त्या वेळी जे कामे मंजूर झाली होती त्या कामांचा नाव बदलवून भाजप सरकारने जनतेला भुलथाप देऊन जनतेला कसे धोका दिला हे सर्वसामान्य जनतेला आता दिसून आले आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन झाले पाहिजे, येणाऱ्या निवडणुकित भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, तसेच काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांसाठी लढणारा एकमेव पक्ष असून, काँग्रेस शिवाय पर्याय नाही. पक्षामध्ये जास्तीत जास्त महिलांना नवीन संधी द्या, व कार्यकर्त्यानी, पदाधिकाऱ्यांनी आता कामाला लागा अशा सक्त सूचना तालुका काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांनी गांधीनगर येथील बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या. पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त महिलांना पक्षाची ध्येय धोरणे समजावून त्यांना पक्षात घ्या व महिलांची गाव कमिटी तयार करून स्वतंत्र बूथ कमिटी स्थापन करण्यात संदर्भात सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बैठकीला तालुका काँग्रेस कमिटी चे सचिव दत्तात्रय लेनगुरे, गणेश ढवळे, मंगल मोहुरले, महेंद्र तुपटे, सुधाकर ढोरे, रविंद्र आदे, दिवाकर राऊत, किसन ढोरे, हरीचंद्र मोहूर्ले, श्रीराम आदे, युवक काँग्रेस चे कोषाध्यक्ष विनोद चंडीकार, विठ्ठल घोरमोडे, ज्ञानेश्वर मेश्राम, मधुसूदन मोहूरले, महिला संगीता मिसार, विद्या नीकोडे, विश्रांती बगमारे, इंदुबाई घोरमोडे, शोभा शेंडे, मंदाबाई ढोरे, ग्रिष्मा ढवळे, आदी काँग्रेस पक्षाचे गांधीनगर येथील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.