घटनात्मक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही तर तिची जोपासना करावी लागते
– रवींद्र तिराणिक
७५ वा प्रजासत्ताक दिन प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व खरे वृत्तांत न्यूज चॅनल तथा अर्ध साप्ताहिक तर्फे
भोजनदान ब्लॅंकेट वाटप तथा स्पर्धात्मक परीक्षेचे पुस्तके वितरण
देशात ७५ व्या प्रजासत्ताक दिन धुमधडाक्यात साजरा होताना. सर्वत्र झेंडावंदन प्रभात फेऱ्या प्रत्येक स्तरावर तिरंगे फडकलेले व्हाट्सअप वेबसाईट डिजिटल मीडिया यावर शुभेच्छांचा वर्षाव राष्ट्रभक्तीचा वीररसमय माहौल राष्ट्र प्रेमाचे प्रतीक म्हणून तिरंगी काटाचे कपडे घालून अनेक जण प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाची जी पवित्र देणगी दिली, ती देशातील प्रत्येक नागरिकांनी टिकवून ठेवणे आजच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. “घटनात्मक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही तिची जोपासना करावी लागते. आपल्या लोकांमध्ये ती अजूनही निर्माण झालेली नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतातील लोकशाही ही मातीवरचे केवळ वरचे आवरण आहे. ही माती मुलत: अ-लोकतांत्रिक आहे’. बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचे स्मरण करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आत्मपरीक्षण करण्यासाठी आजच्या पेक्षा अधिक योग्य अन्य कोणता दिवस असेल, असे भावपूर्ण संवाद पर मनोगत ७५व्या प्रजासत्ताक दिनी सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तथा जनमंच नागपूरचे सदस्य रवींद्र तिराणिक यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनाच्या
औवचित्यावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तथा खरे वृत्तांत न्यूज पोर्टल आणि अर्ध साप्ताहिक यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवीन अन्नयोजना शिवभोजन थाली खरे वृत्तांत त्यांच्या माध्यमातून १५० लोकांना भोजन वितरण, त्याचबरोबर चंद्रपूर आराध्य दैवत महाकाली मंदिर परिसरातील ऊन ,थंडगार वारा सोसत उघड्यावरच संसार थाटून बसलेल्या ज्येष्ठ अबाल व्यक्ती अनाथ अपंग गरजू लहान बालके यांना ब्लॅंकेट वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी श्री गणपर्व चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित दिवंगत खा. बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिका साई मंदिर भिवापूर वार्ड चंद्रपूर येथे स्पर्धात्मक परीक्षा ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करून भविष्यातील नवे आव्हाने! पेलवण्यासाठी अधिकारी होण्याचे नवे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना तिराणिक यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांची संवाद साधत स्पर्धा परीक्षा विषयक काही अडचणी मार्गदर्शन हवे असल्यास अधिकाऱ्यांशी संवाद साधून देण्याचा अभिनव मानस याप्रसंगी व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने प्रेरित असलेल्या अभिनव उपक्रमशील कार्याचे मार्गदर्शक उद्घाटक अध्यक्ष रवींद्र तिराणिक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तथा जनमंच सदस्य नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते. तर अतिथी म्हणून आयुब भाई कच्ची मुख्य संपादक साप्ताहिक रहे खबर तथा साप्ताहिक चंद्रपूर मीडियाचे संपादक गजानन जी हिरेमठ, खरे वृत्तांत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मोरेश्वर उद्योजवार, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मिलिंद वाकडे, समीर आसुटकर ,कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खरे वृत्तांत न्यूज पोर्टल जिल्हा प्रतिनिधी आशिष यमनुरवारउप जिल्हा प्रतिनिधी चंदन देवांगन इतर सह अनेक प्रतिनिधी. आनंद ठाकूर याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.