*ज्येष्ट समाजसेवक भष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास राळेगण सिध्दिचे विश्वस्त तथा गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष डाॅ.शिवनाथजी कुंभारे यांचेशी चर्चा

69

*ज्येष्ट समाजसेवक भष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास राळेगण सिध्दिचे विश्वस्त तथा गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष डाॅ.शिवनाथजी कुंभारे यांचेशी चर्चा

नक्षलग्रस्त अतिदुर्गम आदिवासी गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी,व्यसनमुक्ती,अवैध दारु व सुगंधित तंबाखु विक्रीमुळे गडचिरोली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली आहे ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, कामगार,महिला, युवक विद्यार्थी अधिकारी, कर्मचारी तथा नागरिक मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेलेले आहे. देशातील पंचवीस मागास जिल्ह्यात समावेश असलेल्या व दरडोई उत्पन्न कमी असलेल्या आकांक्षित नक्षलपिडीत अतिदुर्गम जिल्ह्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गडचिरोली जिल्हा पालकमंत्री तथा गडचिरोली जिल्हा व पोलीस प्रशासना कडुन जिल्हा दारुबंदी व व्यसनमुक्ती करिता तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील ग्रामसभेचे प्रतिनिधी,आजी माजी लोकप्रतिनिधी, बुध्दिजीवी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय चिंतन बैठक आयोजीत करण्याबाबत चर्चा गडचिरोली नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा गडचिरोली टाईम्स व माय मराठी चे संपादक प्रकाश ताकसांडे* यांनी केली.