आठवण शाळेची …. १९६९ ला गडचिरोली चे विद्यार्थी भेटले होते राष्ट्रपती पंतप्रधान यांना

71

 

आठवण शाळेची ….

१९६९ ला गडचिरोली चे विद्यार्थी भेटले होते राष्ट्रपती पंतप्रधान यांना

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गव्हर्नमेंट हायस्कूल,गडचिरोलीचे विद्यार्थी हे शैक्षणिक सहल ला दिल्ली-आग्रा येथे गेले असता त्यांची भेट भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याशी झाली होती .देशाचे सर्वोच्च पदावरील नागरिकांची हि भेट अविस्मरणीय होती.या आठवणीने विद्यार्थी वर्ग अजूनही आनंदी होत आहे.हे विशेष.

पूर्वाश्रमीचा चांदा जिल्हाची प्रसिद्ध असलेली गव्हर्नमेंट हायस्कूल,गडचिरोली हि शाळा नावाजलेली होती. या शाळेत प्रवेश मिळणे हे विद्यार्त्यांच्या आई वडिलांना अभिमानाची गोष्ट होती असा या शाळेचा लौकिक होता. या शाळेतील शिक्षक हे सर्व विषयातील पारंगत होते.शाळेची ५ नोव्हेंबर १९६९ ला शैक्षणिक सहल दिल्ली आणि आग्रा ला गेली होती. जगप्रसिद्ध ताजमहाल महल चे दर्शन या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री पी.जी. तल्लारवार शिक्षक आणि प्रयोग शाळा सहाय्यक श्री डी.व्ही. कत्रोजवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

हि सहल दिल्ली येथे गेली असता राष्ट्रपती भवन चे दर्शन घेतल्यानंतर देशाचे राष्ट्रपती श्री व्ही.व्ही.गिरी,पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि उपपंतप्रधान श्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली. यांच्या सोबत समूहाचा त्या काळात फोटो काढण्यात आला होता. परंतु त्या वेळी पोस्टाने फक्त उपपंतप्रधान श्री यशवंतराव चव्हाण यांच्या सोबतचे फोटो प्राप्त झाले.दोन फोटो प्राप्त करण्याचा त्या वेळी अपुरे साधन असल्याने होऊ शकला नाही. या बाबत ची माहिती विद्यार्थी आनंदराव दुधबळे यांनी दिली आहे.या सहल मध्ये पहिली ओळ विद्याथी जी.एस.रामने,दि.एम.साळवे,एस.एम.हर्षे,ए.एफ.दुधबळे,के.एस.हुलके,निझार नाथानी.ए.एन.टिकले,डी.एस.वाढणकर ,दुसरी ओळ एस.इ.गंदेवार,आय.ए.नाथानी,के.एम.नाथानी,के.एम.समर्थ,एम.आर.गोहणे,ए.आर.कोल्हटवार,जी.जे.आखाडे,के.एच.नाथानी, सहल प्रमुख श्री पी.जी. तल्लारवार शिक्षक,प्रयोग शाळा सहाय्यक श्री डी.व्ही. कत्रोजवार,ए.डी.पोरेडीवार,के.ए.पवार,एल.पी.पाल,ए.दि.मेंडावार,इ.एच.ठाकरे आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते.

येत्या रविवार ला गव्हर्नमेंट हायस्कूल,गडचिरोलीने ७५ वे वर्ष सुरु असल्याने माजी विद्यार्थी यांच्या वतीने माजी शाळा नायक उदय धकाते यांच्या मार्गदर्शनात भव्य असा अमृत महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात १९५१ मध्ये शिकत असलेले देशभरातून ४ फेब्रुवारीला २४ ला शाळेत आयोजित महोत्सवात विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होत आहे.