*हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांचा गोंडी गाण्यावर ठेका*

92

*हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांचा गोंडी गाण्यावर ठेका*

 

*भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर*

 

एटापल्ली:महिला ही अबला नसून सबला आहे.आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीच्या बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे. संक्रांतीच्या शुभेच्छा देत नारिशक्तीचा जागर व्हावा म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

 

ते 2 फेब्रुवारी रोजी एटापल्ली येथे संक्रांती निमित्त आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदीकुंकूचा वाण देण्यात आला. यावेळी लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणी बक्षीस देण्यात आले.तर काही महिलांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचे नाणे आणि पैठणी देण्यात आले.विशेष म्हणजे विधवा स्त्रियांचा हळदी कुंकू आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

 

या कार्यक्रमात शेकडो महिलांनी हजेरी लावली होती.कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी गोंडी गाण्यावर ठेका धरला यावेळी महिलांच्या आग्रहास्तव भाग्यश्री ताईंनी देखील गोंडी गाण्यावर ठेका धरत महिलांचा उत्साह द्विगुणित केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवतींनी परिश्रम घेतले.