*विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम*
*धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..!*
*अहेरी* :- विद्यार्थ्यांनी पुस्तकाला आपला मित्र बनवुन,आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा असे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे अहेरी येथील स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना जीवनात मोठे ध्येय संपादन करण्यासाठी कठोर मेहनत,जिद्द आणि चिकाटी असणे महत्त्वाची असते,जास्तीत-जास्त पुस्तक वाचन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि आपलं ध्येय लवकर गाठता येते असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार अवधेशरावबाबा आत्राम,प्राचार्य अनिल भोंगळे,माजी प्राचार्य प्रमोद दोतुलवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवराचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.स्नेहसवर्धनोत्सव निमित्ताने विविध कला,समूह नृत्य,क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूह नृत्याच सुदर सादरीकरण केल.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश ठिकरे यांनी तर आभार प्रा.उरकुडे यांनी मानले.
यावेळी स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रमाला पालक वर्ग,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!