झोपेत असताना पत्नीची कुऱ्हाडीने पतीनेच केली निर्घृण हत्या
गोंडपिपरी तालुक्यातील खळबळजनक घटना
मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही मुले गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी कापसाची गाडी भरायला गेली असता झोपेत असलेल्या वेडगाव येथील लता दामोदर धुडसे( वय ४० वर्ष ) यांच्यावर पतीनेच वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनगक घटना दि.(१६) शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता घडली.
गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी मृतक लता धूडसे यांचे दोन्ही मुले कापूस भरण्यासाठी गेली व मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घरी काम आटपून परतले असता त्यांची आई ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली बाजूला कुऱ्हाड देखील होती. आणि वडीलांचा शोध घेतला असता कुठेच आढळले नाही. फरार असल्याचे निदर्शनास आले.पत्नीवर आरोपी दामोधर मारोती धुडसे यांनी कुऱ्हाडीने वार करून निरघुण हत्या केल्याचां अंदाज असून घडलेली माहिती गावकऱ्यांनी लाठी पोलिसांना दिली सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. आरोपीचा शोध लाठी पोलीस घेत आहे.हत्तेचे कारण गुलदस्त्यात असून पोलीस तपास करत आहे.