जगप्रसिद्ध क्विक हील फाउंडेशन तर्फे जे. एम. पटेल महाविद्यालयाला सहा पुरस्कार
संगणक विभाग, जे.एम. पटेल कॉलेज व जगप्रसिद्ध क्विक हील फाउंडेशन यांच्या “सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा” या मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भंडारा शहरातील प्रतिष्टीत जे. एम. पटेल कॉलेज ला “सहा पुरस्काराने” पुरस्कृत करण्यात आले. बेस्ट प्रोसेस कंप्लायन्स या श्रेणीतील प्रथम पुरस्काराने जे. एम. पटेल कॉलेजला पुरस्कृत करण्यात
आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यासह संगणक विभाग प्रमुख डॉ. प्रविण घोसेकर यांना एक्सट्रा माईल अचिव्हर्स या पुरस्काराने
पुरस्कृत करण्यात आले. विद्यार्थ्यांमधून बी.एससी. द्वितीय वर्षाच्या कु. लावण्या मने व शरयू सारवे
यांना बेस्ट प्रोसेस कंप्लायन्स उपविजेते तसेच कु. सलोनी ठकरेला व कु. वैष्णवी समरीत यांना बेस्ट
प्रोग्रॅम आऊटरिच अँड इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी उपविजेते या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा ‘कमवा व शिका’ या योजनेचा भाग होता. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना क्विकहील फाउंडेशन, पुणे तर्फे २,३०,४०० इतके विद्यावेतन सुद्धा देण्यात आले. विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये ३ हजार पासून ते ३० हजारापर्यंत विद्यावेतन धनादेशाच्या द्वारे देण्यात आले. जगप्रसिद्ध क्विक हील फाउंडेशन या संस्थेनी नुकताच हा पुरस्कार सोहळा पुणे येथे आयोजित केलेला होता.
या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी डी.आय.जी. श्री संजय शिंत्रे, महाराष्ट्र सायबर पोलीस, डॉ. प्रकाश महानकर कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, कुलगुरु कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे होते. क्विकहिल टेकनॉलॉजि चे संचालक डॉ. कैलाश काटकर व डॉ. संजय काटकर तसेच विवकहील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अनुपमा काटकर यांच्या प्रमुख उपस्थतीतीत संपूर्ण सोहळा पार पडला.
संगणक शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्रविण घोसेकर, डॉ. सबाह नसीम, सौ. प्रियंका शर्मा, श्री पलाश फेद्देवार यांनासुद्धा या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
क्विक हील सायबर सुरक्षेसाठी विविध उपाययोजना पुरविणारी जगातील नामवंत संस्था असून CSR अंतर्गत, क्विक हील फाउंडेशन आपल्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करीत असते. पुरस्कार समारंभात जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाजातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता पसरवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले.
सध्याची पिढी अधिक डिजिटल जाणकार आहे आणि बहुतेक विद्यार्थी स्मार्टफोन तसेच इतर गॅझेट्स कार्यक्षमतेने हाताळतात. त्यामुळे सायबर विश्वात ते खूपच असुरक्षित आहे. त्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरक्षित करण्यासाठी, जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर्सनी शालेय विद्यार्थ्यांना इंटरनेट, मोबाइल आणि इतर उपकरणे नैतिकतेने तसेच विवेकपूर्णपणे कसे हाताळायचे याबाबतचे प्रशिक्षण दिले.
जे.एम. पटेलच्या एकूण २४ सायबर योद्ध्यांनी केवळ २ महिन्यांच्या काळात १४५ शाळेमधील ३०,००० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण दिले. जे.एम. पटेलच्या सायबर योद्धयांनी शेतकरी, शेतमजूर, बचत गटांचे सदस्य, आरोग्य कर्मचारी, फेरीवाले, दुकानदार, भाजी विक्रेते, भजन मंडळ, गणपती-देवी मंडळ इत्यादींसह समाजातील अनेक व्यक्तींना प्रशिक्षण दिले. या सायबर योद्धयांनी जे.एम. पटेल महाविद्यालया तर्फे ऑक्टोबर महिन्यात शहरामध्ये सायबर सुरक्षा रॅली आयोजित करून तसेच विविध ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करून जनजागृती केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, सायन्स फोरमचे अध्यक्ष डॉ. शाम डफरे तसेच अंतर्गत गुणवत्ता कक्ष (IQAC) समन्वयक डॉ. कार्तिक पणिकर यांनी क्विक हील फाऊंडेशन आणि जे.एम.
पटेल कॉलेज, भंडारा यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या “सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा ” या मोहिमेत
सहभागी झालेल्या सायबर योद्ध्यांचे अभिनंदन केले.
संगणक शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्रविण घोसेकर, डॉ. सबाह नसीम, सौ. प्रियंका शर्मा, श्री पलाश फेड्डेवार आणि सौ. फरीना शेख या संपूर्ण प्रवासात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहित केले,