सिरोंचा तालुक्यातील 13 ग्राम पंचायतीवर आविसंची एक हाती सत्ता

111

सिरोंचा तालुक्यातील 13 ग्राम पंचायतीवर आविसंची एक हाती सत्ता

सिरोंचा तालुक्यात ग्रामीण भागात आविसचे वर्चस्व कायमच

सिरोंचा:- तालुक्यात पार पडलेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आदिवासी विध्यार्थी संघाने ग्राम पंचायत वेंकटापूर ,नारायणपूर व असरअल्लीसह 13 मेजर ग्राम पंचायतमध्ये एक हाती सता स्थापना केले असून आणि पाच ग्राम पंचायतमध्ये प्रत्येकी पाच सदस्य निवडून आले.तर तीन ग्रामपंचायत मध्ये एक-एक सदस्य अभावी सत्तेपासून वंचित राहावे लागले.
आदिवासी विद्यार्थी संघांनी सिरोंचा तालुक्यातील 30 ग्राम पंचायती पैकी 20 ग्राम पंचायतीची निवडनुक लढवली असून यात 13 ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता स्थापन केले आहे.
आदिवासी विद्यार्थी संघांनी
वेंकटापूर,असरअल्ली,गारकापेठा, नारायणपूर,सिरकोंडा, परसेवाडा, नरसिहपल्ली,झिंगानूर,कप्पेला,कोरला माल, मोटला टेकडा, लक्ष्मीदेवीपेठा, चिंतारेवला ग्राम पंचायतींमध्ये आविसने एक हाती सत्ता संपादन केले असून ग्राम पंचायत विठ्ठलरावपेठा 4 सदस्य,मोयाबीनपेठा 4 सदस्य,पेंटिपाका 4 सदस्य,गोलागूडम 4 सदस्य,जानमपल्ली 3 सदस्य निवडून आले आहेत.
आविस नेते व माजी आमदार श्री. दिपक दादा आत्राम व जि .प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार आणि आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आले.23 ग्राम पंचायात पैकी वेंकटापूर ग्राम पंचायतमध्ये गेल्या वीस वर्षांपासून अविसच्या हातात सत्ता आहे हे विशेष. आविसने 13ग्राम पंचायतीत झेंडा फडकविल्याने स्थानिक राजकारणात व सिरोंचा तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष असलेल्या मधुकर कोल्लूरी यांच्या स्व ग्रामपंचायत असलेल्या गारकापेठा ग्राम पंचायतमध्ये आविसने बाजी मारीत इथे 9 सदस्य पैकी आविस चे आठ सदस्य निवडून आले.

सिरोंचा तालुक्यात आविसने आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात आदिवासी विध्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम,जिल्हा परिषद सदस्य सरिता तैनेनी, आविस जेष्ठ नेते शंकर मंदा,कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुनराव आकुला,आविस सल्लागार रवी सल्लम,संतोष पडालवार,नागराज इंगीली , वासू सपाट, दुर्गेश लंबाडी सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
आविसचे सर्व नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तथा सदस्य यांच्या पुष्पगुच्छ देवून आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करणात आले.