खचू नका। जिद्द ठेवा। मेहनत घ्या। यश निश्चित मिळेल।
विलास गावडे
एटापल्ली : मी 10 व्या वर्गात नापास झालो होतो। पण जिद्द ठेवली। नव्या उर्मिने अभ्यासाला लागलो। मेहनत घेतली। म्हणूनच मला यश मिळाले। असे प्रतिपादन विलास गावडे यांनी केले।
भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली कडून आदिवासी युवक आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर त्यांच्या व्याख्यान कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते।
2019 च्या केंद्रीय लोकसेवा आयोग च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक मध्ये त्यांना 245 वा क्रमांक मिळाला आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस बलात अससिस्टंट कंमॉंडेंट म्हणून त्यांची निवड झाली आहे।
स्थानिक आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत जागरूक व्हावा म्हणून एटापल्ली तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांच्या व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला जात आहे।
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास निरीक्षक रवि आत्राम होते। वक्ते विलास गावडे होते। प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक पी वि गरकल, सावित्री काळे यांची होती।
कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली।
प्रसंगी मार्गदर्शन करताना विलास गावडे म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थी नी स्वतःला कमकुवत समजू नये। मेहनत करण्याची तयारी ठेवावी। आदिवासी भागांतून आल्यामुळे अनेक अडचणी येतात। त्यांच्यावर मात करावी। असे केले तरच यश मिळेल। मी 10 व्या वर्गात नापास झालो होतो। शाळा सोडली असती तर खेड्यात असतो। पण पुन्हा अभ्यास सुरू केला। काहीतरी बनायचे आहे। या ध्येयाने कामाला लागलो। आजही बस जात नसलेल्या गावातून पुण्यात शिकायला गेलो। मेहनत घेतली। अनेकदा अपयश आले। पण ध्येय गाठण्यासाठी अभ्यास सुरू ठेवला। आणि यशस्वी झालो।
उद्दिष्ट ठेवून विद्यार्थी नी कामाला लागावे असे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले।
प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक गरकल, काळे यांनी ही मार्गदर्शन केले।
कार्यक्रम चे संचालन संजना उसेंडी हिने केले। प्रास्ताविक प्रा किशोर बुरबुरे यांनी केले। आभार शिक्षक ए आर शेख यांनी मानले।