कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिक्षण राज्यमंत्री कडून सत्कार

107

कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिक्षण राज्यमंत्री कडून सत्कार:

अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्यांना डिजिटल गुणवत्तापूर्ण व बाल मैत्रीपूर्ण वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी गेल्या 3 वर्षापासून बिसीपीटी मुंबई व अपेक्षा होमिओ सोसायटी मोझरी व स्वच्छ बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 30 जिल्हा परिषद शाळेत इंग्लिश इ टिच प्रकल्प राबविण्यात येत होता. कोरोना काळात शाळा बंद होत्या व मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेले. या काळात सुद्धा मुलांना डिजिटल पद्धतीने ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी संदीप मडामे यांनी प्रयत्न केले. सोमल्पुर व भुरसीटोला या गावात सरपंच श्री लिंलेश्वर खुणे यांच्या सहकार्याने हनुमान मंदिरात वर्ग सुरू ठेवले. या कार्याची दखल घेत अपेक्षा होमिओ सोसायटी मोझरी व चाईल्ड अलायसच्या माध्यमातून कोरोणा काळात सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवून डिजिटल गुणवत्तापूर्ण व बाल मैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती करणाऱ्या शाळा समन्वयक संदीप मडामे यांनी शिक्षण देण्याचे काम केले.
स्वच्छ बहुद्देशीय संस्था अमरावती चे कार्यकर्ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उत्कृष्ट काम करणारे संदीप मडामे यांचा सत्कार राज्यमंत्री बच्चू कडू अप्पर मंत्रालयीन सचिव नंदकुमार साहेब अमरावतीच्या आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आला यांच्या प्रसंगी नंदकुमार यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रयोगाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हितगुज साधले.
सदर कार्यक्रमाला प्रा. सुभाष गवई, डॉ. मधुकर गुंबळे डॉ. विलास शेंडे,संजीवनी बर्डे, नरेंद्र पवार ,संजीवनी पवार, स्वच्छ बहुउद्देशीय संस्थेचे संचालक उदय नानकर आदीची उपस्थिती होती.