नारायणपूर ग्रा.पं.वर आदिवासी विद्यार्थी संघाचे एकहाती सत्ता

108

नारायणपूर ग्रा.पं.वर आदिवासी विद्यार्थी संघाचे एकहाती सत्ता

तब्बल पंधरा वर्षांनंतर सत्ता परिवर्तन…ग्रा.पं.वर सत्ता काबीज करण्यात आविसं ला आलंय यश

सिरोंचा :- तालुक्यातील महत्वपूर्ण व मेजर ग्राम पंचायत असलेल्या नारायणपूर ग्राम पंचायतीवर सर्वपक्षीय पॅनल ची धुव्वा उडवित आदिवासी विद्यार्थी संघाने आपला झेंडा फडकविला आहे.

ग्राम पंचायत ची सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासूनच नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्राम पंचायतची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविले तर सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन आविस विरुद्ध पॅनल उभे केले होते.मागील पंधरा वर्षांपासून या ग्राम पंचायत मध्ये सत्ता परिवर्तनच झाला नव्हता.यावेळी मात्र आविसने चांगले उमेदवार उभे करून नऊ पैकी सहा जागांवर विजय मिळवीत एकहाती सत्ता काबीज केले.

या ग्रामपंचायतचे सरपंच राजिता चंद्रय्या सडमेक तर उपसरपंच म्हणून अशोक संमय्या हरी हे बहुमताने निवडून आले.सरपंच ,उपसरपंच निवडणूकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून एस.एस.शिवहरे तर तलाठी आर.पी.शेरकी. ग्रामसेवक एम.एल.मेश्राम उपस्तीत होते.निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडला.

नारायणपूर ग्राम पंचायत ची निवडणूक आविस ने आविसचे विदर्भाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात लढविण्यात आले.

नारायणपूर या ग्राम पंचायतीवर आविसची सत्ता बसविण्यासाठी आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, जि.प.सदस्या जयसुधा जनगम, आविस सल्लागार रवी सल्लम, नागराज इंगीली, मल्लांन्ना पांते,मारांना मोरे,संपत हरी,अशोक इंगीली, गट्टू शिवनारायण चेंमकरी,संपत कडेकरी, राजू गडडंम,जिठ्ठा रामचंद्रम, लक्ष्मण बोल्ले,मल्लेश अत्तेला, जाडी नागेश,गट्टू कडेकरी,बापू भंडारी,जवाजी अशोक सह नारायणपूर, आमरादी व बोगापूर येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सरपंच व उपसरपंच निवडून आल्यानंतर आविस कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा केले.