मुडझा येथे सरपंचपदी शशिकांत कोवे तर उपसरपंच पदी शोभा जेंगठे अविरोध

98

मुडझा येथे सरपंचपदी शशिकांत कोवे तर उपसरपंच पदी शोभा जेंगठे अविरोध

गडचिरोली
-तालुक्यातील मुडझा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक 16 फेब्रुवारी रोजी पार पडली. . यात सरपंचपदी शशिकांत कृष्णाजी कोवे तर उपसरपंच पदी शोभा साजन जेंगठे यांची अविरोध निवड करण्यात आली.

सरपंचपदासाठी 2 नामांकन अर्ज सादर करण्यात आले यात शशिकांत कृष्णाजी कोवे आणि सुरेखा अनिल सुरपाम यांनी अर्ज भरला.सुरेखा सुरपाम यांनी अर्ज मागे घेतला व सरपंच पदी शशिकांत कोवे यांची बिनविरोध निवड झाली.तर उपसरपंच पदासाठी शोभा साजन जेंगठे व जोसना प्रमोद उमरगुंडावार यांनी अर्ज भरला. जोसना प्रमोद उमरगुंडावार यांनी उपसरपंच पदाचा नामांकन अर्ज मागे घेतला व उपसरपंच पदी शोभा साजन जेंगठे यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी श्री.बोपनवार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले व त्यांना तलाठी खांडरे यांनी सहकार्य केले
निवडणुकीसाठी नवनिर्वाचित सदस्य राकेश लोणारकर,विवेक बारसिंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य तुनाजी बोरकूटे,तुळशीराम गडपायले, साजन जेंगठे, पितांबर कुंदलवार, अविनाश येमुलवार, वामन सोनूले,किशोर जेंगठे,योगाजी जेंगठे, धोंडुजी चौधरी, आनंदराव जेंगठे, दिवाकर जेंगठे, मुखरू लडके, किशोर सोनूले,सुधीर चौधरी, राजू चुधरी, दिलीप चुधरी, रमेश पेंद्राम, खुशाल कोवे, रुपेश लोणारकर यांनी सहकार्य केले