मार्कंडा कंसोबा ग्रामपंचायतीवर जनसेवा लोकशाही आघाडीचा झेंडा.

91

मार्कंडा कंसोबा ग्रामपंचायतीवर जनसेवा लोकशाही आघाडीचा झेंडा.
सौ वनश्री चापले सरपंच तर उपसरपंच पदी सौ.सुनीता कातलाम

चामोर्शी-
तालुक्यातील मार्कडा कंसोबा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली. यात जनसेवा लोकशाही आघाडीच्या सौ वनश्री चापले यांची सरपंच पदी निवड झाली तर उपसरपंच पदी सौ सुनीता कातलाम यांची निवड झाली.

सरपंच पद हे नामाप्र स्त्री या प्रवर्गासाठी राखीव होते. सरपंच पदासाठी जनसेवा लोकशाही आघाडीकडून सौ वनश्री चापले यांनी अर्ज भरला तर परिवर्तन विकास आघाडीकडून सौ भारती पोटवार यांनी अर्ज भरला.यात वनश्री चापले यांना 5 मते तर भारती पोटवार यांना 4 मते पडली.सरपंच पदी वनश्री चापले यांची निवड झाली.तर उपसरपंच पदी जनसेवा लोकशाही आघाडीच्या सौ सुनीता कातलाम यांनी व परिवर्तन विकास पॅनलच्या सौ. गोसावी यांनी अर्ज भरला.यात सौ सुनंदा कातलाम यांना 5 मते तर तर सौ. गोसावी यांना 4 मते पडली.सौ सुनंदा कातलाम यांची उपसरपंच पदी निवड झाली.

9 सदस्यीय असलेल्या मार्कंडा कंसोबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय बहिरेवार यांच्या नेतृत्वात जनसेवा लोकशाही आघाडीचे 5 सदस्य निवडून आले तर कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस समर्थीत परिवर्तन विकास आघाडीचे 4 सदस्य निवडून आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचे अभिनंदन केले. व मार्कडा गावाच्या विकासासाठी पुरेपूर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जनसेवा लोकशाही आघाडीच्या सदस्यांची सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड होताच त्यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला.यावेळी ग्रा प. सदस्य विजय बहिरेवार, नंदकिशोर सिडाम, साईनाथ कुळमेथे हजर होते.