शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा आष्टी ग्रामपंचायतीवर आष्टी शहर विकास आघाडीचे एकहाती वर्चस्व.

80

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा आष्टी ग्रामपंचायतीवर आष्टी शहर विकास आघाडीचे एकहाती वर्चस्व.

सरपंचपदी बेबीताई बुरांडे तर उपसरपंच पदी सत्यशील डोर्लीकर.

चामोर्शी-
आज आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली.सरपंचपदी आष्टी शहर विकास आघाडीच्या बेबीताई बुरांडे यांची अविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी आष्टी शहर विकास आघाडीचे सत्यशील डोर्लीकर यांची अविरोध निवड झाली.

15 सदस्यीय असलेल्या व राजकीय दृष्ट्या प्रभावशाली आष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात 13 सदस्य शिवसेनेचे निवडून आले तर कांग्रेसचे दोन सदस्य निवडून आले. आष्टी शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी फार मोठया फरकाने कांग्रेस समर्थीत उमेदवारांचा पराभव केला.
महत्वाची बाब म्हणजे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात आष्टी ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा आष्टी शहर विकास आघाडीने एकहाती सत्ता ताब्यात घेतली.2010 च्या निवडणुकीत 13 पैकी 13 सदस्य 2015 च्या निवडणुकीत 12 सदस्य तर 2021 च्या निवडणुकीत 13 सदस्य निवडून आले. सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्ता संपादन करून शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले.

आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विराजमान झालेल्या बेबीताई बुरांडे या सलग दुसऱ्यांदा ग्रा. प .सदस्य म्हणून निवडून आल्या तर उपसरपंच पदी निवड झालेले सत्यशील डोर्लीकर हेही सलग दुसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून आले.
सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पार पडताच आष्टी शहर विकास आघाडीच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला व आनंद साजरा केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व ग्रा.प. सदस्य राकेश बेलसरे ग्रा प. सदस्य कपिल पाल, संतोष बारापात्रे, छोटू दुर्गे, सौ. सुनंदा आंबटकर, सौ रेश्मा फुलझेले, सौ रुपाली कटकमवार, सौ लता पोरटे, सौ पूनम बावणे,विद्या जूनघरे, लाजवंती औतकार,उपस्थित होते.