खास.अशोक नेते यांच्या हस्ते आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

67

खास.अशोक नेते यांच्या हस्ते आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

गडचिरोली :- दि 19/2
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली येथे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या शुभ हस्ते, भाजपचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवें, युवा मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुरके, नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, आदिवासी मोर्चा चे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोकजी नेते म्हणाले , देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आत्मनिर्भर भारत या अभिनव योजनेतून युवक-युवतींनी विविध प्रशिक्षण घेऊन लघुउद्योग उभारावे व आत्मनिर्भर होऊन राष्ट्र विकासास आपला हातभार लावावा असे प्रतिपादन केले तसेच आत्मनिर्भर भारत या योजनेद्वारे युवकांना प्रशिक्षित करून त्यांना लघुउद्योग उभारण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी तथा त्यांना स्वयंरोजगार उभारुन राष्ट्र विकासास हातभार लागावा या उदात्त हेतूने सदर योजना राबविण्यात येत असून याद्वारे विभिन्न प्रशिक्षण देऊन युवक-युवतींना आत्मनिर्भर बनविण्यात येणार आहे.

  1. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 21 लाख 97 हजार कोटिचा निधि आत्मनिर्भर भारत योजनेकरिता दिला आहे
    जंगल,डोगंराड भागांत ओषधि वनस्पती ची लागवड व व्यापार करीता 1 हजार कोटी ची तरतुद आत्मनिर्भर भारत मध्ये आहे.यात प्रशिक्षण ची व्यवस्था आहे. यांत्रिकीकरण करीता हि मदत आहे.मधमाश्या पाडने,मध गोडा करने या करीता आत्मनिर्भर भारत मध्ये 5 हजार कोटि ची तरतुद आहे.शेतीला. पुरक व्यवसाय म्हणून मच्छीपलन करीता 50 हजार कोटिची तरतुद आहेबांबू क्षेत्राकरीता हि तरतु आहे महिला व बचत गट करीता हि भरीव तरतुद आहे
    भाजपा व भाजपातील ईतर मोर्चा च्या पदाधिकारी यानी गरजुना लाभ मिडवुन देन्याचे कार्य या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावे असे आव्हान केले

यावेळी मा.योगीताताई पिपरे,नगराध्यक्ष, न.प.गडचिरोली. मा.वामणजी तुर्के,प्रदेश उपाध्यक्ष, युवामोर्चा, महाराष्ट्र.मा.रमेशजी भुरसे,प्रदेश सदस्य. मा.रविभाउ ओलालवार,जिल्हामहामंत्री, मा.गोविंद जी सारडा जिल्हामहामंत्री,मा.प्रमोदजी पिपरे,जिल्हामहामंत्री, मा. रंजिताताई कोडापे, सभापती, जि.प.समाजकल्याण, मा.चांगदेवजी फाये,जिल्हा अध्यक्ष, युवामार्चा, गडचिरोली. मा.स्वप्नील जी वरघंटे,प्रदेश सदस्य, युवामार्चा , शंभुविधी गेडाम, जिल्हा संयोजक, आत्मनिर्भर भारत, गडचिरोली. मा.मुक्तेश्वर जी काटवे,भाजपा शहर अध्यक्ष, सागरजी कुमरे शहर अध्यक्ष, युवामोर्चा. साईलजी कोडापे, भाजपा युवक आघाडी अध्यक्ष,उपस्थित होते