रयते च्या समस्या नोंदवीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

119

रयते च्या समस्या नोंदवीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.

आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर च्या वतीने आज महानगर पालिका समोर गांधी चौक येथे जनतेच्या समस्या जाणुन घेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी

आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर च्या वतीने आज महानगर पालिका समोर गांधी चौक येथे जनतेच्या समस्या जाणुन घेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने रयतेचा राजा,जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करीत अनेक समस्या ना वाचा फोडली.
स्थानिक सरकार नगर प्रभागातिल रहिवासी श्री.रमेश रामटेके यांनी परिसरात डास नियंत्रीत करणारी ” फोगिंग मशीन ” महिन्यात एकदा सुद्धा फिरत नाही अशी तक्रार या वेळी केली….
चंद्रपुर महानगर पालिका प्रशासनाने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये डास नियंत्रणावर ₹ 40 लक्ष खर्च करुन सुद्धा वार्डात ” फोगिंग मछीन ” फिरत नसेल तर मग फक्त कागदावर बिले बनवायचे आणि भ्रष्टाचार करुन मलाई आपसात वाटुन खायची असा गोरख धंदा महानगर पालिका मध्ये सुरु असल्याचा आरोप आम आदमी पार्टी चंद्रपुर महानगर चे अध्यक्ष इंजि.प्रशांत प्रभाकर येरणे यांनी या प्रसंगी केला.
कोरोना लॉक डाउन काळातील चार महिन्याचे वीजबील माफ करण्याचे सार्वजनिक पणे जाहिर करुन सुद्धा सर्व सामान्य गोर गरिब जनतेला विज बिल माफी न देनारया या रयतेवर अन्याय करनारया आणि स्वताला छत्रपती शिवाजी महाराज याचे अनुयायी असल्याची शेकी मिरविनार्या राज्य शासनाचा निषेद आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर चे संघटन मंत्री श्री. सुनिल रत्नाकर भोयर यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला….
इंदिरा नगर परिसरातील श्री.विजय साठे यांनी अवैध दारु विक्री मुळे परिसरातील शांतता भंग झाल्याची तक्रार करीत अनेकदा पोलिस प्रशासनाला तक्रार करुन सुद्धा अवैध दारु विक्री राजरोस पणे सुरु असल्याची तक्रार आम आदमी पार्टी च्या कार्यक्रम स्थळी केली.
जर हे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी जर रयतेचे , सामान्य माणसाला भेडसावणारे प्रश्न मार्गी लावित नसेल तर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा उपयोग करुन लोकांना खोटे आश्वासन देऊन जनतेला फसविन्याचा अधिकार नाही आहे.
जर खरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयते चे राज्य आणायचे असेल तर महाराष्ट्रात फोफावत असलेला भ्रष्टाचार मग तो महानगर पालिका मध्ये असो किव्हा राज्य शासना अंतर्गत येनारया कार्यालयात वाढत चाललेला भ्रष्टाचार असेल आणि त्याला आश्रय देनारया लोकप्रतिनिधी जसे नगरसेवक,आमदार खासदार,मंत्री यांनी यावर नियंत्रण ठेवावे ही माफक अपेक्षा चंद्रपुर ची जनता आजच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना ठेवत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महानगर कोषाध्यक्ष श्री.अशोक आनंदे, उपाध्यक्ष श्री.योगेश आपटे,श्री.सिकंदर सागोरे,श्री.वामनराव नंदुरकर,श्री. शंकरभाऊ धुमाळे, श्री.दिलीप तेलंग आणि असंख्य कार्यकर्ता उपस्थिती होते….