पालकांनी विद्यार्थ्यांवर आपले निर्णय न लादता यशस्वी व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करावे
गीता हिंगे
स्कूल ऑफ स्कॉलर गडचिरोली च्या वतीने शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सीनियर केजी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा संस्थेचे अध्यक्ष पं. शंकर प्रसाद अग्निहोत्री आणि सचिव सचिन अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तथा आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे , प्रा. संध्या येलेकर होत्या.
मुख्य अतिथी व उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना सौ गीता हिंगे यांनी आपल्या स्वतःच्या दोन्ही मुलांची सत्य कथा पालकांना सांगितली. गडचिरोली मध्ये मुलांचे सर्वांगीण विकास करणारी आणि त्यावर परिश्रम घेणारी एकमेव शाळा आहे म्हणजे स्कूल ऑफ स्कॉलर आहे असे मत व्यक्त केले. इथे पालकांना खुश करण्यासाठी कुठला ही प्रोजेक्ट राबविल्या जात नाही, मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला जातो हे प्रकर्षाने जाणवते असे आपल्या भाषणात सौ गीता हिंगे यांनी प्रतिपादन केले. सौ गीता हिंगे यांचे दोन्ही मुल इथेच शिकले आणि इथूनच भविष्य घडल, दोन्ही मुलं आयआयटी मध्ये होते आणि आता चांगल्या नामांकित कंपनी मध्ये मोठ्या पदावर आहेत. एक कर्तुत्ववान म्हणून त्यांनी आपला ठसा समाजात रोवला,अश्या विचारधारेचा शिक्षण प्रणाली गडचिरोलीत असताना पालकांनी बाहेर जाण्याचा अट्टाहास करू नये, आणि मुलांवर जबरदस्तीने आपले निर्णय न लादता त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात प्रगती करू देणे आणि त्यांना एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे असे मत गीता हिंगे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन, शिस्तबद्धता कौतुकास्पद आणि वाखाणन्याजोगे होते. यासाठी प्राचार्य आणि शिक्षकवृदांचे खूप खूप अभिनंदन. मला विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आणि सन्मानित केल्याबद्दल स्कूल ऑफ स्कॉलर चे प्राचार्य सन्माननीय लोंढे सर , उपप्राचार्य सन्माननीय शैलेश आकरे सर, वैशाली भरडकर मॅडम, नंदनपवार मॅडम तसेच आदरणीय सर्व शिक्षक वृन्दांचे मनःपूर्वक आभार!